22 February 2025 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

महाशिवआघाडीसाठी सोनिया गांधींचा होकार जवळपास निश्चित असल्याचं वृत्त

NCP, Shivsena, Congress

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी काँग्रेस आणि एनसीपी यांच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द झाली असून, ही बैठक आज, बुधवारी होणार आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडीत सामील होण्यास काँग्रेसला मुळीच हरकत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही सोनिया गांधी यांच्याशी या नेत्यांनी चर्चा केली. हिंदुत्वापेक्षा मराठी माणसाचे हक्क ही शिवसेनेची मूळ भूमिका आहे आणि ती आपल्या विचारसरणीच्या आड येणार नाही, असे या नेत्यांनी त्यांना सांगितले, तसेच एकदा किमान समान कार्यक्रम नक्की केल्यानंतर या अडचणी राहणार नाहीत, असे या नेत्यांचे म्हणणे होते. ए. के. अँथनी, के. सी. वेणुगोपाल आदी नेत्यांचा बिगरमराठी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेसोबत जाण्यास विरोध आहे, पण ती भूमिका आता कालबाह्य ठरल्याचे नेत्यांनी सोनिया गांधी यांना पटवून सांगितले.

एकीकडे काँग्रेस आणि एनसीपी’ची आज बैठक पार पडणार आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांची भेट घेणार आहेत. यावेळी सरकार स्थापन करण्यात का उशीर होत आहे, याबाबत ते त्यांना माहिती देणार आहेत. तसंच या बैठकीत शिवसेनेची पुढील रणनितीदेखील ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि एनसीपीच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नव्या आघाडीचं नाव काय असेल? तसंच ३ पक्ष एकत्र आले तर येत्या मुंबई महानगरपालिकेत निवडणुकांची स्थिती कशी असेल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#NCP(372)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x