11 January 2025 2:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

‘ट्राय’ अध्यक्षांना ‘नको ती ट्राय’ भोवली, हॅकरने आधार डेटा हॅक करून दाखवला!

french hacker, hacked Aadhar card data, Trai Chiarmans

नवी दिल्ली : ट्राय’चे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी आधार कार्डची माहिती किती सुरक्षित आहे हे देशाला दाखवण्यासाठी थेट आधार क्रमांक हॅक करुन दाखवा असं चॅलेंजच दिलं होतं. त्यासाठी त्यांनी आपला आधार क्रमांक ट्विटरवरुन शेअर केला. आधार कार्डचा नंबर सार्वजनिक केल्याने गोपनिय माहिती उघड होते असा आरोप याआधी वारंवार करण्यात आला आहे. त्यामुळेच आधार कार्डच्या सुरक्षेबाबत आधीच सर्वोच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल आहे.

परंतु शर्मा यांना हे धाडस आणि नको ती ‘ट्राय’ चांगलीच अंगलट आल्याचं समोर आलं आहे आणि आधार कार्ड वरील व्यक्तिगत माहिती किती असुरक्षित आहे हे सुद्धा त्या अनुषंगाने सिद्ध झाल आहे. कारण आधार क्रमांक शेअर करण्याच्या थोड्याच वेळात फ्रान्समधील सुरक्षा संशोधक असल्याचा दावा करणाऱ्या इलिअट अल्डरसन या हॅकरणे शर्मा यांची वैयक्तिक संपूर्ण माहिती उघड केली आहे.

इलिअट अल्डरसन या फ्रेंच हॅकरणे शर्मा यांचं हे आवाहन स्वीकारलं आणि काही क्षणातच शर्मा यांचा आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाइल क्रमांकच थेट त्याने ट्विट केला. त्यानंतर इलिअट अल्डरसने एकामागोमाग एक ट्विट करत शर्मा यांच्या खासगी जीवनातील अनेक माहिती जाहीर केले. त्यात शर्मा यांच्या घराचा पत्ता, जन्मतिथी, फोन क्रमांक इत्यादींचा समावेश आहे. त्यानंतर त्याने शर्मा यांचे खासगी फोटोही हॅकरने शोधले आणि ट्विट केले. परंतु फोटो शेअर करताना शर्मा यांच्या खासगी आयुष्यात अडचणी नकोत म्हणून काही फोटो त्याने ब्लर करत योग्य ती काळजी घेतली त्यात त्यांच्या पॅन कार्डचाही समावेश आहे.

शर्मा यांची खासगी माहिती शेअर करतानाच इलिअट अल्डरसनने म्हटलं की, ‘आधार क्रमांक असुरक्षित आहे आणि याद्वारे तुमच्या घराच्या पत्त्यापासून फोन क्रमांकापर्यंत सर्वच खासगी माहिती उघड होते. परंतु मी आता इथेच थांबतो आणि आधारचा क्रमांक सार्वजनिक करणं किती धोकादायक आहे हे आता तरी तुम्हाला समजलं असेल अशी आशा बाळगतो’ असं त्याने शर्मा यांना सूचक ट्विट केलं.

 

News English Title: Story french hacker hacked Aadhar card data of Trai Chiarmans data after open challenge News Latest Updates

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x