6 January 2025 3:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

ते महान का होतात? | जिनिअस, अतिबुद्धिमान लोकांच्या या सवयी - नक्की वाचा

Genius people habits

मुंबई, ३० जून | आपल्याला नेहमीच जिनिअस म्हणजे अति बुद्धिमान लोकांबद्दल जिज्ञासा असते. आणि म्हणूनच आशा यशस्वी आणि बुद्धिमान माणसांबद्दल रिसर्च होत असतात. त्यांची आत्मचरित्रं आपण वाचतो. आणि अशी यशस्वी, जिनिअस व्यक्ती जर आपल्या ओळखीच्या वर्तुळातली असेल तर त्याच्याबद्दल गॉसिप्स होतात. त्यात काही पॉजिटिव्ह तर काही निगेटिव्हसुद्धा असतात…हे सगळं माणूस करतो कारण त्याला माहित करून घ्यायचं असतं की आशा कोणत्या गोष्टी आहेत त्यामुळे हे लोक आपल्यापेक्षा वेगळे आहेत.

ते बॅड लिसनर असतात:
म्हणजे अशी शक्यता आहे की एखादा जिनिअस, बुद्धिमान माणूस बॅड लिसनर असेल. आता असं का? बघा एखादा बुद्धिमान माणूस काही लोकांबरोबर उभा असेल पण तरीही त्यांच्या बोलण्याकडे त्याचे लक्ष नसेल. का? तर, त्याच्या स्वतःच्या डोक्यात इतक्या काही गोष्टी चालू असतात की आपल्या बरोबरच्या ग्रुपच्या गप्पा त्यांना वायफळ वाटतात. आणि आपल्याच एखाद्या विचारात ते गढलेले असतात. तुमच्याच संपर्कातले असे काही लोक नक्कीच तुम्हाला माहीत असतील.

वाचनाची खूप आवड असते:
निरनिराळी पुस्तकं ही लोक वाचतात. आशा वाचनाने या लोकांना आयडिया मिळतात. आणि यावरून ते वेगवेगळे रिसर्च करत असतात.

कमी सोशल असतात:
हे लोक समाजात कमी लोकांशी मैत्री करतात. मैत्रीच नाही तर लोकांमध्ये मिसळून वागण्यात सुद्धा या लोकांना जास्त रस नसतो. त्यामुळे ते आपल्या विचारांना जास्त वेळ देऊ शकतात. हे लोक आपल्या विचारानेच नेहमी काही ना काही सोल्युशन काढत असतात. समाजात मिसळण्यात जाणारा वेळ हे लोक आपल्या विचारात घालवतात. आणि म्हणूनच काही संशोधनं होतात ती अश्या लोकांकडूनच, म्हणून एखाद्याला एकलकोंडा म्हणणं आता सोडून द्या. कोण जाणे उद्या तोच काहीतरी मोठं काम करून जाईल.

झोपण्यापूर्वी खूप विचार करतात:
झोपण्यापूर्वी या लोकांकडे भरपुर वेळ असा असतो की ते शांत वातावरणात आणि एकांतात विचार करू शकतात त्यामुळे ते विचार केलेल्या गोष्टींचं आकलन नीट करू शकतात. अश्या लोकांना लवकर झोप येत नाही. आता बरेच लोकांना लवकर झोप येत नाही. म्हणजे ते सगळेच बुद्धिमान आहेत असे नाही. हे अवलंबून आहे त्यांच्या विचारशक्तीवर. नाहीतर मूव्ही बघून किंवा गेम खेळून उशिरा झोपणारे लोक पण असतात.

त्यांची राहणी व्यवस्थित, पद्धतशीर ठेवण्याकडे दुर्लक्ष करतात:
म्हणजे त्यांची खोली व्यवस्थित नीटनेटकी ठेवण्यात किंवा स्वतः सजण्या धजण्यात ते आपला वेळ वाया घालवत नाहीत.

आळशीपणा शक्यतोवर अतिबुद्धिमान लोक हे आळशी असतात:
हो चक्क आळशी बरंका आणि हे फक्त आम्ही नाही संशोधनसुद्धा सांगतं शास्त्रीय दृष्टया आपण जे अन्न खातो त्याच्यापासून तयार होणारी ऊर्जा आपल्या दिनक्रमात वापरली जाते. या ऊर्जेचा वापर आपलं शरीर दोन प्रकारे करतं. एक म्हणजे शारीरिक क्रिया म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी करून. ज्यामध्ये आपण खूप ऍक्टिव्ह असतो थोडक्यात लेझी असण्या विरुद्ध जे काही आहे ते या प्रकारात मोडतं. आणि याच ऊर्जेचा दुसऱ्या प्रकारातला वापर करतात ते जिनिअस लोक कारण त्यांचा मेंदू जेवढी ऊर्जा वापरेल तेवढी त्यांचं शरीर वापरत नाही. संशोधनात हे सिद्ध झालं आहे की अतिबुद्धिमान लोकांचा मेंदू हा सामान्य बुद्धिमत्ता असलेल्यांपेक्षा २० ते ३० टक्के जास्त ऊर्जेचा वापर करतो. त्यामुळे या लोकांच्या शारीरिक क्रिया या इतरांच्या मानाने मंद असतात. त्यामुळे लोकांना ते आळशी वाटतात. शिवाय हे लोक जेव्हा बौद्धिक काम करत असतात. तेव्हा ते त्यांच्या कामात खूप ऍक्टिव्ह वाटतात. तेव्हा हेच लोक आळशी आहेत यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. तर आता तुम्हाला कोणी आळशी म्हणतच असेल तर त्यांना देण्यासाठी उत्तर मिळालं की नाही.

हे लोक स्वतःशीच बोलतात:
मागेच आपण पाहिलं की हे लोक जास्त सोशल म्हणजे सामाजिक नसतात. त्यांचा जास्त मित्र परिवार नसतो. त्यामुळे जेव्हा या लोकांना काही शंका असते किंवा एखाद्या गोष्टीसाठी ते खुश असतात तेव्हा ते स्वतःशीच बोलतात. कारण त्यांच्याकडे इतरांकडे बोलण्याचा ऑप्शन खूप कमी असतो. या लोकांनी स्वतःमध्येच एक चांगला मित्र शोधलेला असतो. आणि गम्मत म्हणजे यातूनच हे लोक सेल्फ लर्नर बनतात. सेल्फ लर्निंग ने जे तुम्ही शिकतात ते क्रिएटिव्ह असतं त्यात कोणाची कॉपी नसते. त्यात स्वतःचा विचार असतो.

विसरभोळेपणा:
हो खरंच, अतिबुद्धिमान लोकांचा हा पण एक प्रॉब्लेम असतो की हे लोक विसरभोळे असतात. छोट्या छोट्या गोष्टी हे लोक विसरतात. कारण यांच्या डोक्यात व्यापून राहिलेल्या असतात त्या मोठ्या गोष्टी. त्यात ते छोट्या गोष्टींना बायपास करतात थोडक्यात दुर्लक्षित करतात. आणि म्हणून विसरभोळे असल्याचा शिक्का यांच्यावर बसतो. ज्या गोष्टी यांना महत्त्वाच्या वाटतात तिकडे हे लक्ष देतात. त्यावर विचार करतात संशोधन करतात त्यांची उत्तरं मिळवतात. आणि आपण जिनिअस असल्याचं सिद्ध करून दाखवतात. तर विसरभोळेपणा हा काही आजार नाही. तो माणसाच्या मेंदूचा एक पॅटर्न असतो. जास्त विचार करणाऱ्या लोकांमध्ये कमी महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यामुळे या गोष्टी घडतात. जिनिअस, अतिबुद्धिमान लोकांच्या या आठ सवयी आहेत ना इंटरेस्टिंग!! आपल्या अवती भोवती पण असे काही लोक असतील ना, आणि समाज त्यांना विक्षिप्त म्हणून बाजूला टाकत असेल. पण हे लोक मात्र त्यांना विक्षिप्त, आळशी, एकलकोंडे म्हणणारे लोक हे कमी कुवतीचे आहेत असे समजून ते तिकडे साफ दुर्लक्ष करतात. कारण शेवटी “ऍव्हरेज इज नॉर्मल” या तत्वज्ञानाने हा समाज चालतो हे या हुशार लोकांनी समजून घेतलेलं असतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Genius people habits we need to know news updates.

हॅशटॅग्स

#HumanFact(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x