अन्यथा ऑगस्टपर्यंत भारतात कोरोना रुग्ण संख्या एवढ्या लाखांवर असेल; टेस्टची संख्या वाढवणार
नवी दिल्ली, १८ मे: चीन आणि दक्षिण कोरिया या देशांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सुरुवातीचे तीन महिने या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती नंतर ती कमी झाली. या देशांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र चीन आणि दक्षिण कोरियात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसात हा उद्रेक होऊ शकतो अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय.
दुसरीकडे भारतात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याच प्रमाणात केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. आत्तापर्यंतचा ग्राफ लक्षात घेता काही मॉडेल्सवर तज्ज्ञ काम करत आहेत. त्यांच्या मतानुसार जुलै महिन्यात ५ ते ७ लाख नवे रुग्ण येऊ शकतात. तर ऑगस्टमध्ये हाच आकडा १० लाखांपर्यंत जाऊ शकतो. ही वाढ लक्षात घेता सरकारने तयारी सुरू केली आहे.
एवढ्या बेड्सची उपलब्धता, त्यांच्यासाठी लागणारी उपकरणं, मनुष्यबळ, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण अशा सर्व गोष्टींची तयारी करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत. देशात २० मोठ्या शहरांची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर फोकस करण्यात येणार आहे. त्या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, भोपाळ, इंदूर आणि चेन्नईचा समावेश आहे. रुग्णांचं ट्रेसिंग करण्यासाठी टेस्टची संख्या वाढविण्यात येणार आहे. मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टेस्ट करण्यात येणार आहेत अशी माहिती दिली जात आहे.
देशात सध्या ९१ लाख कोरोनाबाधित रुग्ण असून दररोज नव्याने ४ ते ५ हजार रुग्णांची वाढ होत आहे. देशात होणाऱ्या टेस्टमध्ये ४.३ टक्के लोक पॉझिटिव्ह निघत आहेत. पण महाराष्ट्रात हा आकडा ११.९ टक्के एवढा आहे. म्हणजेच प्रत्येक १०० टेस्ट केल्यानंतर राज्यात १२ लोक पॉझिटिव्ह निघत आहेत. दिल्लीत हे प्रमाण ९%, गुजरात (७.८%) छत्तीसगढ़(६%), तेलंगना (५.४%), मध्य प्रदेश (४.९%) आणि पश्चिम बंगाल(४.६%) आहे. हे आकडे १५ मई पर्यंतचे आहेत.
News English Summary: As the number of coronary patients in India is increasing, the central government has started preparations at the same rate. Considering the graph so far, experts are working on some models. According to him, 5 to 7 lakh new patients may come in July. So in August, the same figure could go up to 10 lakhs. In view of this increase, the government has started preparations.
News English Title: Government of India targets 10 million test of Corona virus by July positive patient no may rise till 10 lacks in August News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार