23 February 2025 10:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

जीवनात यश आणि घरात लक्ष्मी हवी असेल तर दररोज करा 'ही' कामे | चाणक्य नीती

Great Chanakya Niti

मुंबई, १४ जून | अशी एकही व्यक्ती सापडणार ज्याला जीवनात यश नको असेल. अनेकजण जीवनात मोठं यश प्राप्त करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात. यश मिळवण्यासाठी व्यक्ती शक्य असेल तितके प्रयत्न करत असतो. पण यश प्रत्येकांच्या नशिबी असेल असे नाही. आपल्या जीवनात यश हवे असेल तर आपण काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. परंतु अनेकजण आपल्या कार्याविषयी गंभीर नसतो. जीवनातील यशाबद्दल आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलं की, प्रत्येक व्यक्तीने दररोज चांगले कार्य केले पाहिजे. या कार्यांमध्येच जीवनात यश मिळण्याचा रहस्य आहे. जे लोग दररोज एक चांगले कार्य करण्याचं ठरवतात, आणि ते कार्य करतात अशा लोकांच्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा असते. हे व्यक्ती आपल्या जीवनातील लक्ष्य सहजतेने आणि लवकर मिळवत असतात.

गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, चांगले काम केल्याने मनाला शांती मिळत असते. मनाची शांती व्यक्तीला श्रेष्ठ कार्य करण्यास प्रेरित करत असते. जे लोक असे करण्यास असमर्थ असतात ते जीवनात संघर्षाला सामोरे जात असतात. विद्वानाच्या मते, व्यक्तीचे यश हे त्यांच्या चांगल्या आणि वाईट कामांवर अवंलबून असते. परंतु कधी – कधी आपल्या जीवनातील व्यस्तता आणि तणावामुळे चांगल्या आणि वाईट कामांमधील भेद करण्यास हे व्यक्ती असमर्थ ठरत असतात. जर वेळ असतानाच योग्य दिशा मिळाली तर व्यक्ती मोठ्या नुकसानापासून वाचू शकतो. यामुळे जीवनात यश आणि लक्ष्मी हवी असेल तर खालील गोष्टींची दक्षता घेणे आवश्यक असते.

चाणक्य नीती नुसार, व्यक्तिने कधीही अहंकार करायला नको. अहंकार व्यक्तिच्या प्रतिभेला प्रभावित करत असते. अहंकार भ्रमाच्या स्थितिमध्येही वृद्धि करत असते. भ्रमपासून दूर राहणारा व्यक्तिचं यश मिळवू शकतो.

यश तेव्हाच मिळते जेव्हा व्यक्ती सर्वांना सोबत घेऊन चालत असतो. आपल्या सहकर्मीचा आपल्या मित्रांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक दिवशी आपल्या कामगारांना आणि आपल्या सहकर्मींना प्रोत्साहित केलं पाहिजे. प्रोत्साहित केल्याने कर्मचाऱ्यांच्या कामात कुशलता येत असते.

 

News Title: Great Chanakya Niti if you want success in life and Lakshmi at home do these tasks every day news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x