21 November 2024 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Horoscope Today | 'या' राशींच्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीकरिता आजचा दिवस ठरेल फायद्याचा; पहा तुमचे भविष्य काय सांगते Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: SUZLON गौतम अदानींनी अधिकाऱ्यांना दिली 20 कोटींची लाच, गुंतवणूकदारांचीही फसवणूक'; अमेरिकेत गुन्हा दाखल IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, स्टॉक ब्रेकआउट देणार, BUY रेटिंग - NSE: IRFC
x

देशात रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लोकांची वणवण | पण गुजरातमध्ये भाजप कार्यालयात स्टॉक

Gujarat, CR Patil, Remedicivir injections

सुरत, ११ एप्रिल: महाराष्ट्रात वीकेंड लाॅकडाऊन सुरू हाेण्याबराेबरच सरकारने तीन दिवसांसाठी खासगी लसीकरण केंद्रे बंद केली आहेत. परंतु सरकारी केंद्रात लसीकरण सुरू राहील. मुंबईत शुक्रवारीही १२० पैकी ७५ लसीकरण केंद्रे बंद झाले. यामध्ये बहुतांश खासगी आहेत. राज्याला दर आठवड्याला ४० लाख डाेसची गरज आहे. केंद्राने १७ लाख डाेस पाठवले असून ते पुरेसे नाहीत, असे आरोग्यमंत्री राजेश टाेपे आधीच म्हणाले होते. तर आता रेमडेसिवीरचाही तुटवडा देशभर जाणवू लागला आहे.

देशात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेच पण दुसरीकडे देशात लसीकरणालाही जोरदार सुरुवात झाली आहे. परंतु, महाराष्ट्रात लसीची कमतरतेमुळे लसीची केंद्र बंद झाली आहेत. इतकंच नाही तर रेमडेसिवीरचाही तुटवडा जाणवू लागला आहे. एकीकडे ही परिस्थतीत असताना दुसरीकडे मात्र गुजरातच्या भारतीय जनता पक्षाच्या एका पक्ष कार्यालयात रेमडेसिविर इंजेक्शन मोफत दिले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे. सरकारनं केलेल्या दाव्यानुसार हे इंजेक्शन सध्या स्टॉकमध्ये नाही. दरम्यान गुजरातच्या एका पक्ष कार्यालयात लोकांना रेमडेसिविर इंजेक्शन मोफत दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या या नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

गुजरातचे भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी दावा केला आहे की, भाजप कार्यालयात ५००० रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना असलेल्या लोकांच्या नातेवाईकांना दिलं जात आहे. यावर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला आहे. जर रेमडेसिविर स्टॉकमध्येच नाही तर भाजपच्या कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात आली कुठून? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

दरम्यान सुरतमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयात रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी लोकांनी सोशल डिंस्टन्सचेही पालन केले नसल्याचे निदर्शनास आले होते. गुजरातचे भाजप अध्यक्ष यांनी लोकांना ५ हजार इंजेक्शन मोफत देण्याची घोषणा केल्यामुळे ही इंजेक्शन्स लोकांना त्यांच्या कार्यालयातून नेण्यास सांगितले होते, अशी चर्चा रंगली आहे.

गुजरातमध्ये या गोष्टी सुरु असताना महाराष्ट्रात रेमडेसिविरचा पुरवठा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच, ऑक्सिजनचा पुरवठाही रुग्णालयात व्हावा अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रात या गोष्टींचा तुटवडा असताना भाजप त्याची मागणी करत असताना दुसरीकडे गुजरातमध्ये भाजपचा कार्यालयात असा त्याचा वापर धक्कादायक आहे.

 

News English Summary: Gujarat BJP president CR Patil has claimed that 5,000 remedicivir injections are being given to relatives of people with corona at the BJP office. Opposition leaders have started bombarding him with questions. If Remedivir is not in stock, then where did such a large number of BJP offices come from? Such a question is currently being posed.

News English Title: Gujarat BJP president CR Patil distributed remedicivir injections free in Gujarat news updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x