गुजरातच्या सरकारी रुग्णालयांमध्ये मृतदेहांचा ढीग | अंत्यदर्शनाची 36 तासांचं वेटिंग, दुर्गंध पसरतोय
गांधीनगर, १९ एप्रिल: भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे. मागील चोवीस तासात देशामध्ये 2 लाख 74 हजार 944 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासोबतच 1 लाख 43 हजार 701 लोक बरे झाले असून 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गुजरात राज्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. राज्यातील परिस्थितीचा अंदाज वलसाडच्या जिल्हा सिव्हिल हॉस्पीटलमधील घटनेवरुन लावला जाऊ शकतो. या हॉस्पीटलच्या कोरोना वार्डातून एका पाठोपाठ एक मृतदेह येतच आहेत. पोस्टमॉर्टम रुममध्येही मृतदेह तसेच पडून आहेत. जिल्ह्यात अचानक वाढलेल्या मृत्यूंमुळे डेथ सर्टिफिकेट तयार करायलाही तासनतास लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की,अनेक मृतदेहांवर मागील तीन दिवसांपासून अंत्यविधी करण्यात आलेला नाही. त्यांना तसेच ठेवल्यामुळे त्यांच्यातून आता वास येऊ लागला आहे.
सिव्हिल हॉस्पीटलचे सुपरिटेंडेंट अमित शहा यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांसाठी या ठिकाणी 400 बेडची सुविधा आहे. पण, अनेक जण परिस्थी गंभीर झाल्यानंतर हॉस्पीटलमध्ये भरती होत आहेत. अशावेळी त्यांना ऑक्सीजन किंवा व्हेटिलेटरची गरज भासत आहे. रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे आमचे कामही वाढले आहे. कोव्हिड वार्डातून पोस्ट मॉर्टम रुमपर्यंत मृतदेहांना नेण्यासाठी बाहेरून लोक बोलवावे लागत आहेत.
वलसाड सिव्हिल हॉस्पीटलबाहेर मृतांचे नातेवाईक अनेक तासांपासून मृतदेहाची वाट पाहत आहेत. यातील काहीजण 36 तासांपासून अंत्यदर्शनाची आस लावून बसले आहेत. हॉस्पीटलच्या गलथान कारभारामुळे लोकांमध्येही नाराजी वाढत आहे.
News English Summary: In Gujarat Corona has a capacity of 400 beds for patients. But, many are being admitted to the hospital after the condition became serious. In such cases, they need oxygen or a ventilator. The sudden increase in the number of patients has also increased our workload. People have to be called from outside to take the bodies from Covid Ward to the postmortem room. Relatives of the deceased have been waiting for the body outside Valsad Civil Hospital for hours. Some of them have been waiting for the funeral for 36 hours. There is also growing resentment among the people over the management of the hospital.
News English Title: Gujarat corona pandemic tension reached on high level news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL