24 November 2024 7:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

लोकसभेत भाजपाला मतं दिली; आता भाजप आमदार महिलांना लाथा देत आहेत

Gujarat, narendra modi

नरोदा : गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या दादागिरीचे अत्यंत निंदनीय आणि भयानक रुप मतदारांसमोर आले आहे. नरोदामधील भारतीय जनता पक्षाचे आमदार बलराम थवानी यांनी एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. नीतू तेजवानी असे जखमी महिलेचे नाव असून त्या स्थानिक एनसीपीच्या वॉर्ड प्रमुख आहेत. आमदार बलराम थवानी आणि त्यांचे समर्थक महिलेला मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अहमदाबाद मिररने हे अधिकृत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बलराम थवानी यांनी घटनेबद्दल खेद व्यक्त करताना महिलेची माफी मागण्याची तयारी देखील दर्शवली आहे. परंतु आपल्यावर पहिल्यांदा हात उचलण्यात आला. त्यामुळे स्वत:च्या बचावासाठी मी महिलेवर हात उचलला असे बलराम थवानी यांनी आपली बाजू मांडताना सांगितले. स्थानिकांनी या घटनेचा लगेच व्हिडिओ बनवला आणि समाज माध्यमांवर या आमदाराचे कृत्य प्रसारित केले. नीतू तेजवानी यांना मारहाण सुरु असताना बलराम थवानी त्यांच्या कार्यालयाबाहेर आले व त्यांनी महिलेला लाथा मारल्या.

स्थानिक विभागात पाणी टंचाईची तक्रार करण्यासाठी नीतू तेजवानी त्या भागातील नागरिकांसोबत बलराम थवानी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. पाणी टंचाईची तक्रार करण्यासाठी महिला माझ्या कार्यालयात आल्या होत्या. सोमवारी मी महापालिका अधिकाऱ्यांशी बोलून ही समस्या सोडवतो असे त्यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी बलराम हाय हायच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. कोणीतरी मला मागून मारले. त्यानंतर मी कार्यालयाबाहेर आलो. त्यावेळी मला धक्काबुक्की करण्यात आली. त्या दरम्यान अपघाताने मी त्या महिलेला लाथ मारली असेल. असे घडायला नको होते असे स्पष्टीकरण बलराम थवानी यांनी दिले. त्यामुळे भाजपचे निवडून येणारे स्थानिक आमदार आणि खासदार सामान्य लोकांसोबत आणि विशेष महिलांसोबत कसे वागतात याचा जिवंत पुरावा समोर आला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x