21 February 2025 3:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

गुजरात; कामावरुन घराकडे निघालेल्या बिहारी तरुणाची अज्ञातांकडून हत्या

अहमदाबाद : गुजरातमध्ये एका बिहारी तरुणाची क्रूर हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक वृत्त आहे. गुजरातच्या गया येथील केडिया गावात अरमजीत नावाचा युवक हा मूळचा बिहारचा राहणारा होता. शुक्रवारी रात्री उशिरा तो कामावरुन घरी परतत असताना, काही अज्ञातांनी अमरजीतवर लोखंडी रॉडने हल्ला करत त्याला क्रूरपणे ठार मारले असं समजत.त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून पुन्हा गुजरात मध्ये उत्तर भारतीयांविरोधात हिंसेचे प्रकार सुरु झाल्याचे समजते. तसेच त्याचा मृत्यू हा गुजरातमधील हिंसक आंदोलनचाच भाग असल्याचा थेट आरोप अमरजीतच्या कुटुंबीयांनी केला आहे.

गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यात बिहारमधील एका बिहारी युवकाने १४ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर, गुजराती समाजाने येथील उत्तर भारतीयांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. तसेच उत्तर भारतीय नागरिकांना, मूळत: बिहार आणि उत्तर प्रदेशातील रहिवाशांना पिटाळून लावले. या हिंसाचारामुळे तब्बल ५०,००० हून अधिक उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन केलं आहे.

याप्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी ४३१ जणांना अटक केली असून ५६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुजरात मधील तब्बल ६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन मोठ्याप्रमाणावर पेटलं होत. त्यामुळे, बिहारमधील युवकाच्या मृत्युलाही ही घटनाच कारणीभूत असून त्यातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x