17 April 2025 4:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

गुजरातचे अकार्यक्षम मॉडेल देशापुढे उघड झालंय | भाजपशासित राज्यातच मोदी मॉडेलचा फज्जा उडाला

Gujarat corona pandemic

मुंबई, २३ | भारतातील भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्येच ‘मोदी मॉडेल’चा फज्जा उडाला असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे राष्ट्रीय पॅनल प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे. “२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ज्या ‘गुजरात मॉडेल’ चा डंका पिटवून देशातील सत्ता काबिज केली, त्याच गुजरातमधे कोरोनाची दूसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल तिथल्या स्थानिक प्रसारमाध्यमांनीच वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाडे काढले आहे.

दुसरीकडे, गुजरात हायकोर्टाने देखील याबाबत कडक शब्दात नाराजी व्यक्त करीत खडे बोल सुनावले आहेत. यामुळे, गुजरातचे ‘अकार्यक्षम मॉडेल’च आता देशापुढे उघड झाले आहे”, अशी खरमरीत टीका काँग्रेसने केली आहे.

मागील महिन्याभरातील वरील राज्यांअंतर्गत परिस्थितीच्या सर्वेक्षणानंतर भारतीय जनता पक्षाची सरकारे असलेल्या राज्यातच ‘मोदी मॉडेलचा फज्जा’ उडाला असल्याची टीका अनंत गाडगीळ यांनी केली आहे. “उत्तर प्रदेशात एकीकडे एका मैदानात एकत्रितपणे शेकडो प्रेतांना अग्नि दिला जात असल्याचे फोटोज परदेशी प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत. तर दुसरीकडे गंगेतून प्रेत वाहत असल्याची दृश्य समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहेत. उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’ बनत चालले आहे”, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.

 

News English Summary: The Gujarat High Court has also expressed strong displeasure over the matter. As a result, Gujarat’s ‘inefficient model’ is now exposed to the nation, “the Congress said in a statement.

News English Title: Gujarat’s inefficient model is now exposed in the nation said congress spokesperson Anant Gadgil news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या