जेव्हा दिग्गज करोडपती कलाकारांना पेट्रोलचे भाव परवडत नव्हते...ते PR मॅनेजमेंट
मुंबई, २६ जून : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. देशात आज सलग विसाव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज डिझले 17 पैशांनी, तर पेट्रोल 21 पैशांनी महागले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८०.१३ रुपये झाले असून डिझेलचे दर प्रति लिटर ८०.१९ रुपये झाले आहेत.
मात्र करोडपती असलेले दिग्गज बॉलिवूड कलाकार ज्यांना अचानक २०१० पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भयंकर वाढल्याचा साक्षात्कार झाला होता आणि त्याबाबत ते समाज माध्यमांवर प्रतिक्रिया नोंदवत होते. आज तेच अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिग्गज कलाकार सध्या शांती राखून आहेत. वास्तविक ते ‘अब की बार मोदी सरकार’ या कॅम्पेनचा भाग होते, ज्याची अघोषित तयारी २०१० पासूनच सुरु झाली होती. भाजपने २०१४ लोकसभा निवडणुकीतील प्रत्यक्ष स्लोगन काही दिवस प्रसिद्ध केले, मात्र अघोषित अँटी युपीए सरकार कॅम्पेन जोरदारपणे सुरु केले होते आणि याच दिग्गज कलाकारांनी त्यासाठी पीआर मॅनेजमेंट केल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच आज ते शांत बसून आहेत हे सिद्ध देखील होतं आहे.
२०११ साली मनमोहन सिंग यांचं सरकार असताना इंधन दरवाढीवरून अक्षय कुमारनं एक ट्विट केलं होतं. ‘मुंबईकरांनी पेट्रोल पुन्हा महागण्याआधी पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा लावल्या आहेत. त्यात अडकल्यानं मला रात्री घरीही जाता आलं नाही,’ असं अक्षयनं त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच अक्षयने याच विषयावरून ट्विटचा सपाटा लावला होता, ज्यातील काही ट्विट त्याने डिलीट केले आहेत.
Couldn’t even get to my house at nite for all of Mumbai was queuing up for #petrol before the prices rocketed again.
— Akshay Kumar (@akshaykumar) May 16, 2011
Hello @akshaykumar why have you deleted this old tweet of yours? At the rate we are going you’ll have to delete all political tweets before May 2014 pic.twitter.com/dejKNx9wR4
— Shivam Vij (@DilliDurAst) May 21, 2018
दुसरकडे अमिताभ बच्चन यांनी 24 मे 2012 साली पेट्रोल, डिझेल दरवाढीवर टीका करताना “पेट्रोलचे दर 7.5 रुपयांनी वाढले. पंप अटेंडन्ट – कितने का डालू?! मुंबईकर – 2-4 रुपये का कार के ऊपर स्प्रे कर दे भाई, जलाना है!!”
News English Summary: With petrol and diesel prices rising daily in the country, the pockets of the common man are being slashed. Today is the twentieth consecutive day of fuel price hike in the country. Today, diesel has gone up by 17 paise and petrol by 21 paise.
News English Title: Had Bollywood actors Amitabh Bachchan and Akshay Kumar had made campaign for Narendra Modi before 2014 Loksabh Election News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा