28 April 2025 8:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER
x

CBI कार्यरत होण्यापूर्वी | भाजप शासित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या सुशांतच्या वडिलांशी भेटीगाठी

Haryana CM Manohar Lal Khattar, Sushant Singh Rajputs father

चंदीगड, 8 ऑगस्ट: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असून, केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरुन राजकीय गदारोळ सुरू असताना सुशांतचे वडील के.के. सिंह यांची आज हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज फरीदाबादमध्ये भेट घेतली. यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत.

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली. सुशांतचा मृत्यू, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह पाच जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांचा समावेश आहे. बिहार पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सीबीआयने जप्त केली आहेत. ईडीने या प्रकरणी रियाचे चार्टर्ड अकाउंटंट रितेश शाह आणि संदीप श्रीधर यांची चौकशीही केली होती. तसेच, सॅम्युएल मिरांडा याची आधी तब्बल नऊ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. काल ईडीने या प्रकरणी रिया, शोविक यांच्यासोबत श्रुती या तिघांची चौकशी केली होती.

दरम्यान, सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला या आशयाचं एक प्रतिज्ञापत्र सुशांतच्या वडिलांनी कोर्टात दाखल केलं आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याआधी सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर इतरही आरोप केले होते. फेब्रुवारी महिन्यातच सुशांतच्या जिवाला धोका आहे अशी तक्रार मी नोंदवली होती असा दावा सुशांतच्या वडिलांनी केला होता. मात्र अशी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आता या प्रकरणात पुन्हा एकदा पोलिसांवर आरोप करत ते रियाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुशांतच्या वडिलांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

 

News English Summary: Actor Sushant Singh Rajput’s death has sparked a political uproar. Singh was received by Haryana Chief Minister Manoharlal Khattar in Faridabad today. This has given rise to political debates.

News English Title: Haryana chief minster Manohar Lal Khattar met Sushant Singh Rajputs father News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony