18 January 2025 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

कोरोना लसचा डोस घेतलेल्या हरयाणाच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण

Haryana Health Minister Anil Vij, Corona Positive, Covaxin

चंदीगड, ५ डिसेंबर : कोरोनाची लस घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: ट्वीट करून दिली आहे. माझा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असं आवाहन देखील आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे. हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात अंबाला कॅन्ट इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अनिल वीज कोविड पॉझिटिव्ह आढळणं हा समाज माध्यमांवरील चर्चेचा विषय ठरलाय. याचं कारण म्हणजे, कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेकची लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. ‘कोव्हॅक्सीन’ लस घेऊन देखील मंत्री अनिल वीज कोरोनाची लागण झाल्याने लशीच्या परिणामकारकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, दुसरा डोस २८ दिवसांनंतर देणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण त्याआधीच अनिल विज हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनावर मात करणाऱ्या ‘कोवॅक्सीन’ या लशीची निर्मिती केली जात आहे.

 

News English Summary: The report of the BJP minister who took the corona vaccine has come out positive. Haryana Health Minister Anil Vij has tweeted that his Corona report was positive. The report of my corona test has come positive and the health minister has also appealed to the citizens who come in contact with me to take the corona test. Haryana Health Minister Anil Vij has been admitted to a government hospital in Ambala Cantt for treatment.

News English Title: Haryana Health Minister Anil Vij Corona Positive even after taking Covaxin news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x