पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला निर्दोष ठरवले आहे का ? - पी चिदंबरम

नवी दिल्ली, २१ जून : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित, की चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे. मेच्या सुरुवातीला येथे पाऊल ठेवलेल्या चीनने डिफेन्स स्ट्रक्चर्स आणि बंकर्सदेखील तयार केले आहेत. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे. गलवान घाटी आणि हॉट स्प्रिंग्ससंदर्भात भारत चीन दरम्यान बोलने होत असतानाच, चीनने येथे आपल्या हालचाली वाढवल्याचे समजते.
आधिकृत सूत्रांच्या हवाल्याने नवभारत टाइम्सने म्हटले आहे, की गलवान खोऱ्यात पेट्रोल पॉइंट 14 जवळील भागांत भारतीय लष्कर धैर्याने उभे आहे. येथेच 15-16 जूनच्या रात्री दोन्ही देशांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या घटनेनंतर लष्कराने म्हटले होते, की दोन्ही देशांचे सैन्य तेथून मागे हटले आहेत. “गलवानमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) आत आहे. मात्र, दोन्हीकडेही लष्कराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लष्कर पूर्णपणे मागे हटलेले नाही.”
दरम्यान, गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतरही काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भारताच्या हद्दीत कोणीही घुसखोरी केली नाही, असे घोषित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला निर्दोष ठरवले आहे का, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
Has PM given a clean chit to China? If so, what is there to negotiate with China? Why are the Major Generals negotiating and about what?
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) June 20, 2020
पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनावरही काँग्रेसने सवाल केले आहेत. गलवान खोरे चीनचेच असल्याचा दावा चीनने केला असला तरी त्याचा उल्लेख पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात का नाही? गलवान खोरे भारताच्या हद्दीत आहे की नाही? गलवान खोऱ्यात चिनी सैनिक असतील, तर ती घुसखोरी नव्हे का? पँगगाँग त्सो भूभागातील घुसखोरीबद्दल केंद्र सरकार गप्प का? १५ जून रोजी चिनी सैनिकांचे मनसुबे उधळून लावले गेले, असे पंतप्रधान म्हणाले. याचा अर्थ घुसखोरी झाली असा होत नाही का? ५ मे ते १५ जून या काळात झालेल्या घुसखोरीबद्दल केंद्र सरकारचे काय म्हणणे आहे? मागे हटण्याची प्रक्रिया, जैसे थे परिस्थिती असे शब्दप्रयोग का केले गेले? अशा अनेक मुद्दय़ांवर पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात कोणताही उल्लेख नाही, असा आक्षेप काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी घेतला आहे.
News English Summary: Even after the all-party meeting on the backdrop of the Indo-China conflict in the Galvan Valley, the Congress has raised questions with the Center. Has Prime Minister Narendra Modi acquitted China by declaring that no one has infiltrated India’s borders, a senior Congress leader and former finance minister has said. Chidambaram said this at a press conference on Saturday.
News English Title: Has Modi Acquitted China Congress Questions Even After The All Party Meeting News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL