मुलगी कोरोनाने मेली असती तर नुकसानभरपाई सुद्धा मिळाली नसती | हाथरस जिल्हा दंडाधिकारी

लखनऊ, २ ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras Gangrape Case) एका 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी तीन सदस्यीय एसआयटीची (SIT) स्थापन केली असून असून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम योगी यांनी गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय संघाची स्थापना केली आहे.
डीआयजी चंद्र प्रकाश आणि आयपीएस पूनम यात सदस्य असतील. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या तळाशी जाऊन SITला दिलेल्या वेळेत रिपोर्ट सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. दरम्यान, प्रकरणात चारही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून तुरुंगात पाठविण्यात आले आहे.
दुसरीकडे एका व्हिडीओत हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना धमकावत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये पीडितेच्या कुटुंबियांना नको त्या पद्धतीने धमकी देणारे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार हे अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पीडितेच्या वहिनीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी माझ्या सासऱ्यांना तुमची मुलगी करोनाने मेली असती तर तुम्हाला नुकसानभरपाई मिळाली असती का?, असा प्रश्न विचारल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. यासंदर्भातील वृत्त आजतकने दिलं आहे.
#VIDEO – मुलगी कोरोनाने मेली असती तर नुकसानभरपाई सुद्धा मिळाली नसती | हाथरस जिल्हा दंडाधिकारी pic.twitter.com/fjG4rVcBlB
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 2, 2020
News English Summary: The video is currently going viral, with District Magistrate Praveen Kumar allegedly threatening the victim’s family in an unwanted manner. The victim’s daughter-in-law has made a shocking revelation that the district magistrate had asked my father-in-law if his daughter Corona had died, would you have received compensation? Aajtak has given the news in this regard.
News English Title: Hathras DM Said You Would Have Not Got Compensation If Your Daughter Had Died Of Corona Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO