21 December 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायदा घ्या - NSE: NBCC Gold Rate Today | खुशखबर, लग्नाच्या हंगामात आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

मीडिया काही दिवसांनी निघून जाईल | आम्ही इथेच आहोत | पीडितेच्या वडिलांना सरकारी धमक्या

Hathras DM, Intimidating Hathras Victims Father, Uttar Pradesh

लखनऊ, २ ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras Gangrape Case) एका 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी तीन सदस्यीय एसआयटीची (SIT) स्थापन केली असून असून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम योगी यांनी गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय संघाची स्थापना केली आहे.

डीआयजी चंद्र प्रकाश आणि आयपीएस पूनम यात सदस्य असतील. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या तळाशी जाऊन SITला दिलेल्या वेळेत रिपोर्ट सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. दरम्यान, प्रकरणात चारही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून तुरुंगात पाठविण्यात आले आहे.

मात्र हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट असताना एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना धमकावत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार पीडितेच्या वडिलांना सांगत आहेत की, “अर्धी मीडिया आज गेली आहे, उरलेला उद्यापर्यंत गेलेले तुम्हाला दिसतील. फक्त आम्हीच इथे तुमच्यासोबत आहोत. आता आपला जबाब बदलायचा का नाही याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे”.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

इंडिया टुडेने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना यासंबंधी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. उत्तर प्रदेश पोलीस आणि हाथरस जिल्हा प्रशासनाने ज्या पद्धतीने संपूर्ण घटना हाताळली आहे त्यावरुन देशभरात उद्रेक आहे. पोलिसांनी पीडितेच्या पार्थिवावर बळजबरी अंत्यसंस्कार केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे.

 

News English Summary: A video has surfaced on social media Thursday evening, in which Hathras District Magistrate Praveen Kumar Laxkar can be seen and heard issuing what could be construed as a threat to the family of the 20-year-old woman who was allegedly gang-raped and later died. Laxkar is heard telling the deceased 20-year-old woman’s family in Boolgarhi village: “Half of the media have left today, the other half will leave by tomorrow. Only we will stand with you. Now it is your decision, if you want to change your statement or not.”

News English Title: Hathras DM Seen Intimidating Hathras Victims Father Media Will Leave After Few Days Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x