योगी सरकारच्या पोलिसांकडून पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कार | कुटुंबीयांचा दावा
लखनौ, ३० सप्टेंबर : माणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.
#VIDEO पुरावा :
भाजप योगी सरकारच्या पोलिसांकडून पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कार | कुटुंबीयांचा दावा खरा.@myogiadityanath @priyankagandhi @RahulGandhi @supriya_sule @PawarSpeaks pic.twitter.com/tu3XVGCetl
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) September 30, 2020
पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचं पार्थिव घरी आणलं जावं यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.
#VIDEO पुरावा :
भाजप योगी सरकारच्या पोलिसांकडून पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कारताना प्रसार माध्यमांपासून सर्वांनाच अशी बंदी घातली होती.@myogiadityanath @priyankagandhi @RahulGandhi @supriya_sule @PawarSpeaks pic.twitter.com/DbfO94ex7U
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) September 30, 2020
रात्री १० वाजता पीडित तरुणीचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान याआधी पीडित तरुणीच्या वडील आणि भावाकडून रुग्णालयाबाहेर निदर्शन करण्यात आलं. परवानगी न घेताच पार्थिव नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्यासोबत काँग्रेस तसंच भीम आर्मीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी यानंतर कुटुंब धरणे आंदोलन करत असून इतर काही संघटनांनी या मुद्द्यावर राजकारण सुरु केलं असल्याचा आरोप केला.
News English Summary: A 20-year-old woman, gang-raped and tortured by four men in Uttar Pradesh’s Hathras two weeks ago, died this morning at a hospital in Delhi. The woman had suffered multiple fractures, paralysis and a deep gash in her tongue in the savage assault compared by many to the 2012 Nirbhaya gang-rape. Injuries to her neck had left her paralysed and struggling to breathe, said doctors. She bit her tongue when her attackers were trying to strangle her.
News English Title: Hathras gang rape Uttar Pradesh Police forcibly took away body for cremation says victims brother Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम