23 February 2025 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांचा धमकाविणाऱ्या व्हिडिओमागील सत्य | कुटुंबीयांचा मोठा खुलासा

Hathras Gangrape, victims in the Hathras, Threatening video, District Collector

लखनऊ, ३ ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवर देशभरात संतापाचं वातावरण असताना पोलिसांकडून विरोधी पक्षातील नेते आणि माध्यमांची होणारी अडवणूक यामुळे उद्रेक वाढताना दिसत आहे. हाथरसला उत्तर प्रदेश सरकारने छावणीचं स्वरुप दिलं असून तब्बल ३०० पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या गावात सात पोलीस वाहनं आणि पाच बॅरिकेट्सही उभे केले आहेत.

मात्र टीकेची झोड उठल्यानंतर योगी सरकारने माध्यमांना परवानगी दिल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. माझ्या बहिणीवर सामूहिक बलात्कारच झाला आहे. प्रशासनाकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच आम्हाला कुणाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करु नये, अशी तंबी देखील दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे. त्याचप्रमाणे गावातल्या काही जणांची भीती वाटत आहे. गावातील लोक आम्हाला मारुन टाकतील, असा खळबळजनक आरोपही पीडित कुटुंबाने केला आहे.

आम्हाला धमकाविण्यात आले. घरातील पुरुषांना मारहाण करण्यात आली. आमच्यावर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते. पोलीस आणि जिल्हा प्रशासन धमकी देत होते. पैसै घेऊन प्रकरण मागे घेण्यास सांगत होते, असा दावा देखील पीडित मुलीच्या काकीने केला आहे.

दरम्यान हाथरसचे जिल्हाधिकारी पीडितेच्या कुटुंबाला धमकावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मीडिया काही दिवसांत निघून जाईल. पण प्रशासन तर इथेच आहे, असं जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित कुटुंबियांनी देखील याबाबत मोठा खुलासा केला आहे.

हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार ( hathras dm video viral) ) यांच्यावर हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा धमकाविणाऱ्या व्हिडिओ सत्य असल्याचा पीडित कुटुंबाने सांगितले आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेली सत्य परिस्थिती आहे. आम्हाला जिल्हाधिकारी धमकावत आहे. तुम्हाला पैसे देतो, केस मागे घ्या, अशी धमकी देण्यात येत आहे, असा दावा पीडित कुटुंबाने केला आहे.

 

News English Summary: The video of the Hathras district collector threatening the victim’s family went viral on social media. The media in this video will be gone in a few days. But the administration is here, said the Collector. The victim’s family has also made a big revelation after the video of the district collector went viral.

News English Title: Hathras Gangrape The families of the victims in the Hathras case made a big revelation about the threatening video of the District Collector Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x