22 January 2025 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

HCQ सोबत अ‍ॅझिथ्रोमायसिन या औषधाच्या वापरामध्ये बदल होण्याची शक्यता

Health ministry, Azithromycin, covid19, Hydroxychloroquine, corona virus, ICMR

नवी दिल्ली, १३ जून: कोरोनाबाधितांवर प्राथमिक उपचार करताना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या गोळयांचा वापर केला जातो. कोरोनाची सौम्य तसंच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या औषधांचा वापर प्रभावी ठरल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. मात्र, लवकरच या औषधाच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या वापरासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच सुधारित मार्गदर्शतत्वे जारी करणार असल्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलशी संबंधित एका सूत्राने याबाबतची पुष्टी केली की, 10 जून रोजी जाहीर झालेल्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये अ‍ॅझिथ्रोमायसिनचे एचसीक्यूसोबत वापर करण्याचा उल्लेख केला नाही. यापूर्वी आयसीएमआरने अशी शिफारस केली होती की, कोरोनावरील उपचारांसाठी एचसीक्यूसह अ‍ॅझिथ्रोमायसिन देखील दिले जाऊ शकते.

एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि क्लिनिकल रिसर्चवर असलेले नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य डॉ. नवीत विग यांनी याबाबत सांगितले, “कोरोना संक्रमित सौम्य रूग्ण किंवा गंभीर रूग्ण असोत, सर्वात मोठा घटक म्हणजे ऑक्सिजनेशन आहे, कोरोना विषाणूच्या उपचारातील अँटीव्हायरल औषधे जास्त प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही. उपचार प्रक्रिया हळूहळू बदलली आहे. पूर्वी अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि एचसीक्यू देण्यात आले होते. मात्र, आता आम्ही संशोधनानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की, अ‍ॅझिथ्रोमायसिनची आवश्यकता नाही आहे.”

दिल्लीतील एम्सनेही या नव्या नियमाचं पालन करण्यास सुरवात केली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालय कोरोना रुग्णांवर नव्या प्रोटोकॉलनुसार उपचार करत आहे. उपचारांची नवीन मार्गदर्शतत्वे लवकरच सार्वजनिक केली जाणार आहेत. कोरोनावरील उपचारामध्ये एचसीक्यू गोळीचा वापर कायम राहिल पण अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या जागी दुसरं औषध दिलं जाऊ शकतं.

 

News English Summary: Hydroxychloroquine and Azithromycin tablets are used in the primary treatment of coronary heart disease. So far, the drug has been shown to be effective in patients with mild coronary heart disease and no symptoms. However, the use of this drug may change soon.

News English Title: Health ministry rollback use of Azithromycin treat covid19 Hydroxychloroquine corona virus ICMR News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x