20 April 2025 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

देशात कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ३२ हजार ६९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

India, Covid 19, Corona Virus

नवी दिल्ली, १६ जुलै : भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशात मागील २४ तासांत ३२ हजार ६९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ६८ हजार ८७६वर पोहोचली आहे. तर एका दिवसात ६०६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींचा आकडा २४ हजार ९१५ इतका झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत आणखी २० हजार ५७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात आतापर्यंत ६ लाख १२ हजार ८१५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३ लाख ३१ हजार १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या आठ दिवसांत २५ हजारांनी वाढणारी करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी वाढली आहे. आठ दिवसांत दोन लाख रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. बरे होणाऱ्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६३.२४ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ६०६ मृत्यू झाले असून, आतापर्यंत २४ हजार ९१५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: According to the information given by the Ministry of Health, 32 thousand 695 patients have been found in the last 24 hours in the country and the total number of patients has reached 9 lakh 68 thousand 876.

News English Title: Highest Single Day Spike Of Covid19 Cases In The Last 24 Hours In India News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या