5 November 2024 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख
x

पुणे-सातारा रस्त्याच काम रखडविणाऱ्या 'रिलायन्सला' टोलवाढीची भेट

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पुणे (देहूरोड)- सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं केवळ अडीज वर्षाचं काम तब्बल साडेसात वर्ष रखडलेलं असताना देखील उलट सरकारच त्यांना वेळोवेळी मुदतवाढ करून देत होती आणि आता त्या दिरंगाईचा सरकारी नजराणा म्हणून ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.

येत्या एप्रिलपासून या रस्त्यावरील खेडशिवापूर ते आणेवाडी टोलनाक्यावरील टोलच्या दरात वाढ केली जाणार असून ही रोजच्या प्रवाश्यांना वाईट बातमी आहे. ज्या ठेकेदाराला स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काळ्या यादीत शामिल करण्याचं भाष्य केलं होतं, परंतु पुन्हा रिलायन्सला वेळोवेळी सूट मिळत गेली आहे आणि इतकेच नाही तर ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.

वास्तविक या १०४ किलोमीटर रस्त्याचं काम ऑक्टोबर २०१० मध्ये सुरु झाले होते जे मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे सजग नागरिक मंचच्या वतीने माहितीच्या अधिकारात विवेक वेलणकर यांनी वेळोवेळी या कामाच्या प्रगती बाबत माहिती अधिकारात सरकारकडून तपशील मागवला. त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीत त्या रस्त्याच्या कामाबाबत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर दिरंगाई करत असल्याचे उघड झाले आहे.

१४ ऑगस्ट २०१६ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी पुणे सातारा रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीच त्यांनी अशा दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला होता परंतु तशी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

विवेक वेलणकर म्हणाले की जर काम वेळेत होत नसेल तर टोल बंद झाला पाहिजे. परंतु इथे उलट दिरंगाईच ‘टोलवाढ’ हे बक्षिसच सरकारने ठेकेदार कंपनीला दिले आहे.

हॅशटॅग्स

#Toll Cha Zol(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x