21 April 2025 4:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Health First | मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पोटदुखीवर हे करा उपाय

Home remedies while Menstruation news update article

मुंबई ७ मे : मासिक पाळी ही महिलांमधील एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे.दर महिन्याला महिलांना मासिक पाळीला सामोरं जावंच लागतं.प्रत्येक महिलांची शारीरिक रचना, आहार, जीवनशैली निरनिराळी असल्याने मासिक पाळीचा त्रासदेखील प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो. मासिक पाळीत काहीच्या पोटात वेदना होतात.शिक्षण अथवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी हा त्रास सहन करणं फारच कठीण असतं. यासाठीच तुम्हाला मासिक पाळी पोट दुखणे उपाय माहीत असणे आवश्यक आहे.

खरं म्हणजे, हा त्रास चुकीचा व्यायाम, तंग कपडे आदि कारणांमुळेही होतो… हे तुम्ही नक्कीच टाळू शकता… पण, काही महिलांना हा त्रास या कारणांशिवायही होतो. त्यांच्यासाठी या सोप्या टीप्स…

गोड-नमकीनचं पदार्थांचं सेवन कमी करा:
गोड – नमकीन पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगण्याचा त्रास वाढतो… तसंच यामुळे सुस्तीही वाढते. त्यामुळे, असे पदार्थ टाळून फळ आणि भाज्यांचा आहार घ्या.

घरगुती उपाय:
पोट दुखी कमी करण्यासाठी २-३ आल्याचे तुकडे, ४ काळीमिरी, एक मोठी वेलची घेऊन त्याचा कूट करून घ्या… हे मिश्रण आता उकळत्या पाण्यात टाका… यात थोडी काळी चहा, दूध, साखर मिसळून घ्या… थोडं उकळल्यानंतर कोमट असतानाच हा काढा घ्या…

तेजपत्याचा काढा:
तेजपत्याची काही पानं बारीक करून घ्या… आणि पाण्यात उकळून घ्या… हा काढा घेतल्यानंतर तुम्हाची पोटदुखी कमी होऊ शकेल.

News English Summary: Menstruation is a natural physical activity in women. Every month women have to face menstruation. Every woman has different anatomy, diet, lifestyle, so menstrual problems can be different for everyone. Some people get stomach ache during menstruation. It is very difficult for women to go out for education or work. This is why you need to know the remedy for menstrual cramps.

News English Title: Home remedies while Menstruation news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या