28 January 2025 9:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

रेमडेसिविरचा तुटवडा तरी राजकीय व्यक्तींना मिळते कसे? | दिल्लीत तुटवडा तरी सुजय विखेंना कशी मिळाली - कोर्टाचे सवाल

remdesivir injections

मुंबई, २८ एप्रिल | दिल्लीतून नगर जिल्ह्यासाठी परस्पर रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन आल्यामुळे वादाच्या आणि टीकेच्या भोवऱ्यात सापडलेले भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं. या संपूर्ण प्रकरणात मी नगर जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बांधील नाही. जनतेने निवडून दिलेल्यान नगरमधील कोणत्याही लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्यांना सर्व पुरावे देईन”, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले होते.

दरम्यान, मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने सर्वसामान्यांना धावाधाव करावी लागत असताना राजकीय व्यक्तीला मात्र १० हजार इंजेक्शन्स मिळतात कसे? असा सवाल उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला केला.

दिल्लीत रेमडेसिविरचा तुटवडा असताना तिथूनच चॉपरने एवढ्या मोठ्या प्रमाणात इंजेक्शन आणली कशी? इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी संपूर्ण साठा केंद्र सरकारकडे सुपुर्द करणे आवश्यक आहे. जेणेकरून केंद्र विविध राज्यांना पुरवठा करेल; पण ही घटना पाहून आम्ही असे म्हणायचे का की, इंजेक्शनच्या पुरवठा खासगी व्यक्तींना केला जातो? असे अनेक सवाल उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केले.

नीलेश नवलखा, स्नेहा मरजवाडी यांनी कोरोनासंबंधी समस्यांबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे -पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासंदर्भातही जनहित याचिका दाखल आहे. या सर्व याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.

त्या वेळी सुजय विखे-पाटील यांच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत कोर्टाने केंद्र सरकारकडे विचारणा केली. औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी आवश्यक ते आदेश दिलेले आहेत. मात्र एक राजकीय व्यक्ती खासगी विमानातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिविरचा साठा कसा काय आणू शकते, हे खासगी वितरण नाही का, असा प्रश्नही न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांना केला. सद्य:स्थितीला ज्याला या इंजेक्शनची गरज आहे त्याला ते मिळायला हवे, असेही न्यायालयाने सुनावले. त्यावर अहमदनगर येथील ही घटना एकमेव नसल्याचा दावा करण्यात आला. त्यावर यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती झाल्यास औषध कंपन्यांविरोधात आदेश देण्याचा इशारा न्यायालयाने दिला.

 

News English Summary: BJP MP Sujay Vikhe-Patil, who was caught in a whirlwind of controversy and criticism for bringing reciprocal remedial injections for the Nagar district from Delhi, had made an important statement. In this whole case I am not bound to answer to anyone outside the Nagar district. If any people’s representative in a town elected by the people asks me a question, I will give them all the evidence, ”said Sujay Vikhe-Patil.

News English Title: How do politicians gets remdesivir injections when there is shortage in India court questions to Modi government news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x