22 January 2025 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

राहुल गांधी यांच्या रोड शोला तुफान जनसागर

Congress, Rahul Gandhi, Kerala

कलपेट्टा : केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमवेत येथे गुरुवारी केलेल्या रोडशोला जनतेचा तुफान प्रतिसाद मिळाला. दरम्यान या रोड शोमध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नितेला यांची देखील विशेष उपस्थिती होती. तसेच या रोडशोदरम्यान काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे सुरक्षा रक्षकांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. राहुल आणि प्रियांका गांधी जनतेला अभिवादन करत होते. राहुल गांधी यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी पुढे येऊन हस्तांदोलन केले.

राहुल व प्रियांका यांची छबी उपस्थित लोकं मोबाईल कॅमेऱ्याने टिपताना दिसत होते. विशेष म्हणजे या रोड शोमध्ये काँग्रेस आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग या दोन्ही पक्षांचे झेंडे देखील फडकताना दिसत होते. राहुल गांधी यांनी जिथे उमेदवारी अर्ज दाखल केल्या त्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारच्या कार्यपद्धतीमुळे दक्षिण भारतातील संस्कृती, भाषा, इतिहास यांना धोका निर्माण झाल्याची भावना जनतेमध्ये आहे.

देशभरातीर जनतेला आश्वस्त करण्यासाठीच मी उत्तर व दक्षिण भारतातून एकाचवेळी लोकसभा निवडणूक लढवत आहे. राहुल गांधी हे अतिशय निर्भय आहेत, वायनाडच्या जनतेने त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी नंतर ट्विटरवरून केले. प्रियांका यांनी म्हटले आहे की, माझा भाऊ हा माझा विश्वासू मित्र देखील आहे. ते वायनाडमधील मतदारांचा अपेक्षाभंग करणार नाहीत. वायनाडमधून राहुल गांधींच्या उमेदवारीमुळे डावे पक्ष प्रचंड संतापले असून, त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र त्याबाबत राहुल म्हणाले की, त्यांनी माझ्याविरुद्ध प्रचार केला वा टीका केली तरी आपण मात्र डाव्या पक्षांवर अजिबात टीका करणार नाही अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x