26 December 2024 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

मोदींचा मतदासंघ पुरामुळे पाण्याखाली | लोकप्रतिनिधी आठवडाभर फिरकलेच नाही | स्थानिकांचा रोष

Varanasi

वाराणसी, ११ ऑगस्ट | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत पुराचा जोरदार फटका बसला आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातील पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. पूराच्या तडाख्यातून वाराणसीतील गावंही बुडाली आहे. वाराणसीत गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकिनारच्या गावांचा त्याचा फटका बसला आहे.

पूरामुळे केवळ शहरी भागातच नाही तर गावातही जलप्रलय आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. वाराणसीतील रमना गावात तर निम्मे गाव जलमय झालं आहे. अनेक शेती गंगा नदीच्या पाण्याखाली आली आहे. बोटीच्या माध्यमातून लोकांना वाचवलं जात आहे.

तर प्रशासनाकडून मदत मिळत नसल्यानं २०२२ मध्ये विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा गावकरी देत आहेत. वाराणसीतील रोहनिया विधानसभा मतदारसंघात रमना गाव येते. ४० हजारपेक्षा जास्त लोकांना पूराचा फटका बसल्यानं त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मतदार संघातील लोकांकडून संताप:
जेव्हा पूरामुळे गावकरी अडचणीत आले आहेत. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र याठिकाणी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सरकार ब्रिटिशाप्रमाणे वागतं. नुकसान भरपाई म्हणून २००, २५० ते ५०० रुपये काही शेतकऱ्यांना मिळतात. नदीकिनारी संरक्षक भिंत बनवल्यास पूराचं पाणी रोखता येऊ शकतं. यासाठी अनेकदा सर्वेक्षण झालं आहे. परंतु ते केले जात नाही. यंदा पूर आल्यानंतरही कुणी आमदार, मंत्री किंवा अधिकारी गावात पोहचला नाही. गावात पूर येऊन १ आठवडा झाला आहे असा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Huge flood in Varanasi news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x