29 April 2025 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER
x

महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले; पश्चिम बंगाल आणि ओडिशा सतर्क

Hurricane Amphan, West Bengal, Odisha

नवी दिल्ली, 20 मे : महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले असून मंगळवारी दुपारी ते पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकल्याने लाखो लोकांना धोक्याच्या ठिकाणांहून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला असून सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आलेल्या या वादळामुळे ओडिशाच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळला आहे. पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० कि.मी. आणि ओडिशातील पारादीपपासून ५२० कि.मी. अंतरावर बंगालच्या उपसागरात या वादळाचे केंद्र असून ते ताशी १४ कि.मी. वेगाने उत्तरपूर्वेकडे सरकत आहे.

दोन्ही राज्ये सतर्कतेवर आहेत. कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये ४० एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने पश्चिम बंगालसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे आणि कोलकाता, हुगळी, हावडा, दक्षिण आणि उत्तर २४ परगना तसेच पूर्व मिदनापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते असा इशारा दिला आहे.

 

News English Summary: Hurricane Amphan swept across the coast of West Bengal and Odisha on Tuesday afternoon, forcing millions of people to evacuate, officials said.

News English Title: Hurricane Amphan swept across the coast of West Bengal and Odisha on Tuesday afternoon News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony