18 November 2024 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

VIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी

Nitin Gadkari

लखनऊ, ०९ जून | उत्तर प्रदेशात एका ऑक्सीजन प्लांटच्या व्हर्चुअल कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जीभ घसरली. नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले – ‘सर्वात पहिले मला आनंद आहे की, कोविडच्या या काळात आपल्या देशात अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागला.’ सदर संवादात त्यांनी हे वाक्य ००:५८ व्या सेकंदाला म्हटल्याचे तुम्ही पाहू शकता.

नितीन गडकरींना जेव्हा आपल्या चुकीची जाणिव झाली, तेव्हा त्यांनी चुक सुधारत म्हटले की, हवेच्या माध्यमातून ऑक्सिजन बनवण्याचे तंत्रज्ञान आहे. कोविडमध्ये अनुभव झाला की, कुणाला 3 ते 4 लीटर तर कुणाला 3 मिनिटांमध्ये 20 लीटर ऑक्सिजनची गरज असते. अशा वेळी सर्व जिल्ह्यांना ऑक्सिजनच्या प्रकरणात आत्मनिर्भर व्हावे लागेल.’

आम्ही आता जियोलाइट 350 टन रूसहून आयात केले आहे. यापुढे आपण या बाबतीत आत्मनिर्भ होऊ, याचा प्रयत्न करावा लागेल. आपले रोड कंस्ट्रक्शन काँट्रॅक्टरने नॅनीमध्ये ऑक्सिजन प्लांट लावण्याचा विचार केला आहे, हे समाजासाठी फायदेशीर आहे. कार्यक्रमामध्ये यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, सिद्धार्थनाथ सिंह आणि महेंद्र नाथ सिंहही उपस्थित राहिले.

गडकरींच्या भाषणातील तीन महत्त्वाचे मुद्दे:
50 बेडच्या रुग्णालयामध्ये मेंडेटरी असेल ऑक्सिजन प्लांट

गडकरी म्हणाले:

  • मी केशव प्रसाद (उपमुख्यमंत्री), सिद्धार्थनाथ सिंह (योगी सरकारमध्ये मंत्री) आणि महेंद्र सिंह यांना म्हणालो की, प्रदेशात जेवढे 50 बेडचे रुग्णालय आहेत, त्यामध्ये ऑक्सिजन प्लांट अनिवार्य केले जावे. सरकारने यावर लवकरच नियम आणावे.
  • आता ऑक्सिजन कंसंट्रेटर देशात तयार होत आहेत. चार लोकांना एकाच सिलेंडरमधून ऑक्सिजन मिळते. आपण महाराष्ट्रात खूप कमी किंमतीत हे खरेदी केले आहे. यासाठी ऑक्सिजन कंसंट्रेटरची बँकही सुरू केली आहे. यामुळे कुणाचाही जीव जाणार नाही. बायपॅकही 2500 खरेदी केले आहे.
  • महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रेमडेसिविरची कमतरता होती, आता आपण आत्मनिर्भर आहोत. यूपीला हवे असेल तर आमच्याकडून घेऊ शकतात. 1250 रुपयांमध्ये ब्लॅक फंकसचे इंजेक्शनही तयार केले आहे. यूपीला आपण देऊ शकतो.

 

News English Summary: Union Minister Nitin Gadkari’s tongue slipped during a virtual event at an oxygen plant in Uttar Pradesh. In his speech, Nitin Gadkari said, “First of all, I am happy that many people in our country lost their lives due to lack of oxygen during the Covid period.” You can see that he said this sentence at 00:58 second in this dialogue.

News English Title: I am happy that many people in our country lost their lives due to lack of oxygen during the Covid period said minister Nitin Gadkari news updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x