22 January 2025 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

VIDEO - अमित शाह यांची ऋणी आहे | कंगनाच्या आईची प्रतिक्रिया | आम्ही भाजपचे झालो

Amit Shah, Kangana Ranaut, Mother Asha Ranuat

मनाली, १० सप्टेंबर : माझ्या मुलीला म्हणजेच कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ऋणी आहे अशी प्रतिक्रिया कंगना रणौतची आई आशा रणौत यांनी दिली आहे. कंगनासोबत जे काही घडलं ते कुणालाही ठाऊक नाही. महाराष्ट्र सरकारने कंगनाला जी वागणूक दिली ती निषेधार्ह आहे. माझ्या मुलीबाबत म्हणजेच कंगनाबाबत जे शब्द महाराष्ट्रात वापरले गेले त्याचा मी निषेध करते.

मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे की सगळा देश माझ्या मुलीसोबत म्हणजेच कंगनासोबत उभा राहिला. लोकांचे आशीर्वाद तिच्या पाठिशी आहेत. मला कंगनाचा अभिमान वाटतो. कंगनाने कायमच सत्याची कास धरली आहे. एवढंच नाही ती यापुढेही तिच्या सत्यावर ठाम राहिल याची मला खात्री आहे” असंही आशा रणौत यांनी म्हटलं आहे.

कंगनाला वाय प्लस सुरक्षा देऊन आणि हिमाचलच्या जयराम ठाकूर सरकारनेही सुरक्षा पुरविल्याने आम्ही भाजपचे झालो आहोत, असे वक्तव्य कंगनाची आई आशा राणौत यांनी केले आहे. कंगनाच्या मूळ घरी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते गेले होते. तेव्हा आशा यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना आम्ही कंगनासोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच घाबरण्याची आवश्यकता नाही. हिमाचलच्या बेडर मुलीचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, असे आश्वासन दिले.

 

News English Summary: Actor Kangana Ranaut’s mother Asha Ranaut and father Amardeep Ranaut have reacted to the incident that happened yesterday in Mumbai at the actor’s office. After hitting out at Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on Wednesday, her mother spoke to a news channel and revealed that they are glad that people are supporting her. Her mother is happy that Kangana is getting support from different political parties like Karni Sena and BJP.

News English Title:  I Thank Mr Amit Shah For Providing Security To Kangna Ranaut Says Her Mother Asha Ranaut Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x