15 January 2025 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

कोरोना रुग्णाच्या मृतदेहातील व्हायरस बद्दल ICMR' कडून महत्त्वाचा खुलासा

ICMR, Covid 19, Patients Dead body

नवी दिल्ली, २० मे: सध्या देशात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात नव्या ५ हजार ६११ रूग्णांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकू संख्या आता ३ हजार ३०३ वर पोहोचली आहे.

तर करोनाग्रस्तांची एकूण संख्या १ लाख ६ हजार ७५० वर गेली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये ५ हजार ६११ नवे रुग्ण आणि १४० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३९ हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर ६१ हजार १४९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहातून व्हायरस पसरण्याच्या भीतीने अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू दिले जात नाहीत. मात्र खरंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या शरीरामार्फत व्हायरस पसरण्याचा धोका आहे का? मृतदेहामध्ये व्हायरस किती वेळ राहतो? याबाबत इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोरोना रुग्णाच्या मृतदेहात व्हायरस हळूहळू कमी होतो, मात्र किती वेळात कमी होतो हे माहिती नाही, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही आयसीएमआरने दिल्या आहेत. मृतदेहातून कोरोनाव्हायरस कधी नष्ट होतो याबाबत आयसीएमआरला विचारणा करण्यात आली. त्यावेळी आयसीएमआरनं सांगितलं, कोरोना रुग्णाच्या मृत शरीरातून व्हायरस हळूहळू कमी होतो. मात्र त्यासाठी किती कालावधी लागतो, तो पूर्णपणे कधी नष्ट होतो याचा कालावधी निश्चित नाही. त्यामुळे मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी आवश्यक ती सर्व काळजी घ्यायला हवी.

 

News English Summary: The virus gradually subsides in the corona patient’s corpse, but it is not known how long it will last, the ICMR said. Therefore, the ICMR has also instructed to take necessary precautions while cremating the body. The ICMR was asked when the coronavirus was destroyed from the body.

News English Title: ICMR say corona virus disappeared slowly from covid 19 patients dead body but time unknown News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x