23 February 2025 12:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

तर भारताची अवस्था इटली सारखी झाली असती; आज मोदी पंतप्रधान असतानाच ते झालं

Rahul Gandhi, PM Narendra Modi. Italy, Corona Crisis

नवी दिल्ली, ३१ जुलै : मागील २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ५५०७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कालही देशात कोरोनाचे ५० हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत भारतामधील १६,३८,८७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ५,४५,३१८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १०,५७,८०६ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज शुक्रवारी भारतात करोनामुळे झालेल्या मृत्युच्या संख्येत ७७९ इतकी भर पडली. करोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

रुग्णांच्या मृत्यु संख्येबरोबरच भारत जगात करोनामुळे सर्वाधिक मृत्यु झालेल्या देशांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी पाचव्या स्थानी असलेल्या इटलीलाही भारतानं मागे सोडलं आहे. इटलीत करोनामुळे आतापर्यंत ३५ हजार १३२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. या क्रमवारीत पहिल्या पाच अमेरिका (१ लाख ५२ हजार ७०), ब्राझील (९१ हजार २६३), ब्रिटन (४६ हजार ८४) आणि मेक्सिको (४६ हजार) आणि पाचव्या स्थानी भारत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागील २४ तासात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या जाहीर केली. त्याचबरोबर मृतांची आणि बरे होऊन घरी परलेल्या रुग्णांची आकडेवारीही जाहीर केली होती. २४ तासात देशात ५५ हजार ७९ नवीन रुग्ण आढळून आले. तर ७७९ रुग्णांचा मृत्यु झाला. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ इतकी झाली आहे. देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ हजार ७४७ इतकी झाली आहे. धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे यातील १८००० रुग्णांचा मृत्यु जुलै महिन्यात झाला आहे.

कोरोनाच्या सुरुवातीला भाजप नेत्यांनी राहुल गांधींना लक्ष करताना म्हटलं होतं की जर आज राहुल गांधी देशाचे पंतप्रधान असते तर भारताची अवस्था इटली देशासारखी झाली असती. मात्र आता सर्वच बाजूने भारत इटलीला देखील मागे टाकत आहे आणि ते देखील नरेन्द्र मोदी पंतप्रधान असताना.

 

News English Summary: Earlier in the coronation, BJP leaders, while paying attention to Rahul Gandhi, had said that if Rahul Gandhi had been the Prime Minister of the country today, India would have been like Italy. But now India is overtaking Italy on all fronts, even when Narendra Modi is the Prime Minister.

News English Title: If Rahul Gandhi had been the Prime Minister of the country today India would have been like Italy News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x