22 February 2025 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा
x

उद्या पाकिस्तानशी युद्ध झाल्यास राज्यांना हत्यारं विकत घ्यायला सांगून विषय राज्यांवर सोडणार का? | केजरीवाल संतापले

CM Arvind Kejriwal

नवी दिल्ली, २६ मे | देशात मागील काही दिवसात लशींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे आणि परिणामी अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ राज्यांवर ओढवली आहेत. त्यामुळे भाजपाशासित राज्य सोडून इतर राज्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले.

राज्यांना जगभरातील कंपन्या कोरोना लस पुरविण्यास तयार नाहीत. केंद्राने हात वर केले आहेत. केंद्र का खरेदी करत नाहीय? लसींची खरेदी आपण राज्यांवर सोडू शकत नाही. आपला देश कोरोनाविरोधात युद्ध लढत आहे. जर पाकिस्तानने हल्ला केला तर तुम्ही राज्यांवर याची जबाबदारी सोडणार आहात का? उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार आहे का की दिल्ली स्वत:ची हत्यारे खरेदी करणार आहे? असा सवाल केजरीवालांनी मोदी सरकारला केला आहे.

सध्याच्या परिस्थितीत टीम इंडिया बनून काम करणे गरजेचं आहे. जर युद्धासारखी परिस्थिती असेल तर त्यावेळी तुम्ही राज्यांना तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणाल का? जर पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध छेडलं तर तुम्ही राज्यांना रणगाडे खरेदी करायला सांगणार का असा सवाल केजरीवालांनी विचारला.

ही वेळ भारताला एकत्र येऊन काम करण्याची आहे, टीम इंडिया म्हणून या संकटाला तोंड द्यायला हवं असं केजरीवाल म्हणाले. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री शिपायाप्रमाणे लढा देत आहेत, मात्र केंद्राचं काम आम्ही कसं करु, असंही केजरीवालांनी नमूद केलं. कोरोनाविरुद्ध आपली लढाई सुरु आहे. या युद्धावेळी सर्व राज्यांनी आपआपलं बघावं असं म्हणून शकत नाही. पाकिस्तानने युद्ध केल्यास उत्तर प्रदेशने तुमचे रणगाडे खरेदी करा, दिल्लीने आपआपली हत्यारे खरेदी करा असं म्हणणार का, असा हल्लाबोल केजरीवालांनी केला.

 

News English Summary: Our country is fighting a war against Corona. If Pakistan attacks, will you leave the responsibility to the states? Will Uttar Pradesh buy its own tanks or will Delhi buy its own weapons? Kejriwal has asked this question to the Modi government.

News English Title: In case of a war should asked states to purchase weapons said CM Arvind Kejriwal during drive in vaccination center launched news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x