20 April 2025 10:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

देशात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, २१ जुलै : देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत देशात ३७,१४८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. आतापर्यंतचा देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ५४ हजाराच्या पार गेला आहे. तर यामध्ये आतापर्यंत २८,०९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

११,५४,९१७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामधील ७,२४,७०२ लोकं कोरोनावर मात करून सुरक्षित आहेत. देशभरात ४,०१,७१२ कोरोना ऍक्टिव केसेस आहे. तसेच महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ८,२४० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हा ३,१८,६९५ इतका आहे. देशभरात चाचण्यांचा वेग वाढवल्यामुळे करोना बाधित सापडण्याचे प्रमाणही वाढत आहे. भारतात समाधानाची बाब ही आहे कि, अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

आतापर्यंत एकूण ११ लाख ५५ हजार १९१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यात ४ लाख दोन हजार ५२९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, तर सात लाख २४ हजार ५७८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत करोनामुळे २८ हजार ८४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सोमवारी देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

 

News English Summary: Tests are also one of the reasons behind the increase in the number of patients with coronary heart disease. Accelerated testing across the country is also increasing the incidence of corona infections. The point of satisfaction in India is that there are more patients recovering than active corona patients.

News English Title: In India Covid 19 Cure Cases More Than Active Patient News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या