23 February 2025 8:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भारत निर्मित कोरोना लस येण्यास कमीतकमी वर्ष लागणार - ICMR

ICMR, BBIL, Covid 19 Vaccine, Corona Virus

नवी दिल्ली, २५ मे : भारतात आयसीएमआर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड मिळून कोरोनाला रोखणारी लस विकसित करत आहेत. कोरोना व्हायरसमधून बाजूला करण्यात आलेल्या स्ट्रेन इंडियन काऊन्सिल ऑफ  मेडिकल रिसर्चच्या पुण्यातील नॅशनल इन्स्टियुट ऑफ वायरोलॉजी लॅबमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या स्ट्रेन भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड म्हणजे बीबीआयएलकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

“कोरोना व्हायरस विरोधात लस विकसित झाल्यानंतर सर्वप्रथम आधी प्राण्यांवर चाचणी केली जाईल. त्यानंतर मानवी चाचण्या सुरु होतील. लस कितपत सुरक्षित आणि प्रभावी आहे ते या चाचण्यांमधून सिद्ध होईल. या सर्व प्रक्रियेला एक वर्ष लागेल” असे आयसीएमआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. बीबीआयएल व्हायरसला संपवणारी लस विकसित करत आहे. ही लस टोचल्यानंतर शरीरात इन्फेक्शन विरोधात अँटीबॉडी तयार होईल.

सिरम इन्स्टियुट, काडिला, इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड आणि भारत बायोटक या चार कंपन्या लस विकसित करत आहेत. दरम्यान, कोरोनावर लवकर लस मिळण्याची शक्यता मावळत चालली आहे. नजिकच्या काळात करोनाची लस मिळेलचं याची शाश्वती नाही, असा इशारा कॅन्सर आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाने दिला होता.

विलियम हेसलटाइन, असं या शास्त्रज्ञांचं नाव आहे. विलियम हे कर्करोग, एचआयव्ही/एड्स आणि मानवी जीनोम प्रकल्पांसंदर्भात काम करतात. ‘रॉयटर्स’शी बोलताना विलियम म्हणाले,”करोनाचा मुकाबला करण्यासाठी नजिकच्या काळात लस तयार होण शक्य नाही. त्यामुळे लॉकडाउन उठवताना किंवा शिथिल करताना सर्वच देशांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि स्वयं क्वारंटाइन या पद्धतीचा उपयोग करायला हवा,” असा सल्ला त्यांनी दिला होता.

 

News English Summary: In India, ICMR Indian Council of Medical Research and Bharat Biotech International Limited are developing a vaccine to prevent corona. The strains removed from the corona virus were placed in the lab of the Indian Council of Medical Research’s National Institute of Virology in Pune.

News English Title: In india ICMR and BBIL is making covid 19 vaccine on corona virus News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x