25 November 2024 2:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

बिहारच्या ज्या जिल्ह्यातून रोजगार योजनेचा शुभारंभ..तिथेच मजुरांना काम मिळेना

Bihar district, PM Narendra Modi, Employment scheme, Garib Kalyan Rojagar Yojana

पाटणा, ९ जुलै : ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ आखली आहे. या पार्श्वभूमीवर २० जून रोजी सदर योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.

बिहारमधील खगरियामधून अभियांचा शुभारंभ करण्यात आला होता. ”लॉकडाउनमुळे अनेक मजुरांचे हाल झाले. त्यामुळे अनेक मजूर आपापल्या गावी परतले. यामध्ये बऱ्याच मजुरांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे स्थलांतरामुळे ज्या लोकांचे काम सुटले त्यांना आता रोजगार मिळणार” असल्याचं मोदींनी म्हटलं. तसंच या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना घरा जवळ काम मिळावं, असा आमचा हेतू आहे. आतापर्यंत मजुरांनी त्यांच्या कौशल्याने व श्रमाने शहरांना झळाळी दिली. मात्र आता ते गावांसाठी करावे, असं आवाहन देखील मोदी यांनी केलं होतं.

पंतप्रधान मोदींच्या गरीब कल्याण रोजगार योजनेंतर्गत कामगारांचे शिक्षण आणि कौशल्याधारित काम देण्याचं सांगण्यात आलं. योजनेनुसार कामगारांना १२५ दिवसांचे काम देण्याचं या योजनेत नमूद करण्यात आलंय. मात्र, ज्या जिल्ह्यात या योजनेचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला. त्याच जिल्ह्यातील कामगारांना अद्यापही रोजगार मिळाला नसल्याचं समोर आलं आहे.

द इंडियन एक्सप्रेसने पंतप्रधान रोजगार अभियानांतर्गत मिळणाऱ्या रोजगारासंदर्भात खगडिया जिल्ह्यातील सर्वात कमी विकसित असलेल्या अलौली विभागातील 3 गावांमधून माहिती घेण्यास सुरुवात केली. हरिपूर, मेघौना आणि सहसी या गावात रोजगार अभियनांतर्गत उपलब्ध झालेल्या रोजगारासंबंधीची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार, हरिपूरमध्ये पावसामुळे काम बंद झाल्याचे दिसून आले, त्यामुळे 100 मजुरांवर बिकट परिस्थिती आली असून 20 मजूर हे स्थलांतरीत आहेत. तर, येथील मनरेगा अधिकारी रामकेबल पंडित पीएम गरिब कल्याण अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या रोजागाराची माहिती देण्यात असमर्थ ठरले.

दुसरीकडे गिद्ध गावातील परिस्थितीही वेगळी नाही, येथे वाड्यांचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, या कामातून केवळ 6 जणांना 20 दिवसांचे काम मिळाल्याचं मनरेगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तर, मैघौना पंचायत विभागात अद्यापही पीएम रोजगार अभियानांतर्गत रोजगार उपलब्ध झाला नाही. अलौली येथे 21 ग्रामपंचायत क्षेत्र असून त्यापैकी 10 गावातही अद्याप या योजनेतून कामे देण्यात आली नाहीत. अलौली चे विस्तार अधिकारी म्हणाले की, या विभागात केवळ 3 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये, 21 सार्वजनिक शौचालय बनविण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत 30 दिवसांचे काम निर्माण होईल. त्यासाठी 300 रुपये रोजगार देण्यात येणार आहे.

 

News English Summary: It was asked to provide education and skill based work to the workers under Prime Minister Modi’s Poor Welfare Employment Scheme. According to the plan, the workers will be given 125 days work. It has come to light that the workers of the same district have not got employment yet.

News English Title: In the district where PM Narendra Modi launched the employment scheme, the workers could not get jobs in Bihar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x