25 December 2024 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

देशात अनलॉकनंतर कोरोनाचे थैमान; २४ तासांत ३२५ मृत्यू, ११,५०२ नवे रुग्ण

Covid 19, Corona Virus, India

नवी दिल्ली, १५ जून : भारतातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ११ हजार ५०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ३२ हजार ४२४ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत ३२५ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या ९ हजार ५२० इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ३ लाख ३२ हजार ४२४ पैकी १ लाख ५३ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ लाख ६९ हजार ७९८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाख ३२ हजार ४२४ इतकी झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे एक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. आतापर्यंत एक लाख ६९ हजार ७९८ जणांनी करोनावर मात केली आहे. एक लाख ५३ हजार १०६ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत ९ हजार ५२० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

 

News English Summary: In the last 24 hours, 11 thousand 502 new patients have been registered in the country. As a result, the number of corona victims in the country has reached 3 lakh 32 thousand 424. In the last 24 hours, 325 people have lost their lives due to corona, bringing the total number of corona victims in the country to 9,520.

News English Title: In the last 24 hours 11 thousand 502 new covid 19 patients have been registered in the country News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x