23 February 2025 7:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

राहुल गांधींच्या प्रश्नाला अमित शहांकडून तो व्हिडिओ ट्विट करून प्रतिउत्तर

India China, Rahul Gandhi, Amit Shah

नवी दिल्ली, २० जून : गलवान खोऱ्यातील संघर्ष सध्या देशातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. भारत चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा वर्षावच सुरू केला होता. या सगळ्या वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रश्न उपस्थित करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे.

शहीद झालेल्या 20 जवानांच्या मृत्यूवरून देशातील राजकारण तापलं आहे. याच दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी राहुल गांधी यांना राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. ‘भारतीय लष्कर सक्षम आहे. ते चीनचा पराभव करू शकतात. राहुल गांधी यांनी यामध्ये राजकारण करू नये. माझा मुलगा लष्करात लढला आणि यापुढेही लढत राहिल’ असं जखमी जवानाच्या वडिलांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

या सगळ्या वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रश्न उपस्थित करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे. तो व्हिडीओ ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे. “एका शूर जवानांच्या पित्यानं स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. आज संपूर्ण देश एकवटला आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं आणि राष्ट्राच्या हितासाठी एकजुटीनं उभं राहायला हवं,” असं ट्विट करत अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे.

 

News English Summary: Twenty Indian soldiers were killed in a skirmish in the Galvan Valley during the military-level talks between India and China. From that, the opposition had started asking questions to the Modi government. In all these controversies, Union Home Minister Amit Shah has answered the question raised by Congress leader Rahul Gandhi.

News English Title: India China Controversies Union Home Minister Amit Shah has answered the question raised by Congress leader Rahul Gandhi News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x