25 December 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

देशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर : देशात मोठय़ा संख्येने करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार २४७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ९३,३३७ रुग्णांची नोंद झाली. तर उपचार सुरु असलेल्या १२४७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५३,०८,०१५ इतकी झाली आहे. यापैकी १०,१३,९६४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशातील ४२,०८,४३२ जणांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे देशातील ८५,६१९ जणांनी प्राण गमावले आहेत. तर दुसरीकडे देशात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वेगानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ९५ हजार ८८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

 

News English Summary: India recorded 93,337 cases of the coronavirus disease (Covid-19) and 1,247 deaths in the last 24 hours, taking the country’s tally past 5.3 million, according to the Union health ministry on Saturday. The health ministry’s dashboard showed at 8am that there were 1,013,964 active cases of Covid-19 and the death toll has risen to 85,619.

News English Title: India Covid Cases Cross 53 Lakh Record 95880 Recoveries In A Day Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x