8 January 2025 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD
x

देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर | एका दिवसात ९६,५५१ नवे रुग्ण

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढातना दिसत आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहोचली आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली, आंध्रप्रदेश,कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.

गेल्या २४ तासांत देशात ९६ हजार ५५१ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३५ लाख ४२ हजार ६६४ जणांनी करोनावर मात केली आहे. भारतातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण इतर देशांपेक्षा चांगलं आहे. देशात सध्या ९ लाख ४३ हजार ४८० करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ लाख ४३ हजार ७७२ एवढा झाला आहे, यापैकी २लाख ४३ हजार ४४६ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनामुळे २७ हजार ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातलं कोरोना मृत्यूचं प्रमाण २.९ टक्के एवढं आहे.

 

News English Summary: Coronavirus LIVE Updates: India registered a record 96,551 coronavirus cases in 24 hours taking the total number of infections to over 45.62 lakh, government data showed today. The country also recorded the highest deaths in a day with 1,2019 fatalities, taking the overall toll to 76,271. This was the second day in a row that a record spike was recorded in both cases and deaths.

News English Title: India Covid19 Case Tally Crosses 45 Lakh Mark Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x