16 April 2025 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती

India China, Galwan Clash, Rajnath Singh, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात लोकसभेत लडाखच्या मुद्यावरून भारत – चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. ‘सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्व आणि वेळ परीक्षण तंत्र (Time Tested Mechanism) आहे, ज्यामध्ये केंद्रीय पोलीस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लडाख दौरा करून भारतीय जवानांची भेट घेतली आणि समस्त देशवासी आपल्या वीर जवानांसोबत उभे आहेत, हा त्यांना संदेशही दिला’ असं राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं.

“एप्रिल महिन्यात पूर्व लडाख सीमेवर चिनी सैनिकांची संख्या आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या संख्येमध्ये वाढ दिसून आली. मे महिन्याच्या सुरुवातीपासून चीनने गलवान खोऱ्याच्या भागात आपल्या सैनिकांच्या गस्तीमध्ये अडथळे आणायला सुरुवात केली. ज्यामुळे समोरा-समोरच्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

“चीनची ही कृती म्हणजे एकतर्फी जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला हे मान्य नाही हे चीनला मुत्सद्दी तसेच लष्करी पातळीवरुन कळवण्यात आले” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

“एलएसीवरील वाढता संघर्ष लक्षात घेऊन दोन्ही बाजूच्या सैन्य कमांडर्समध्ये सहा जून २०२० रोजी बैठक झाली. त्यामध्ये तणाव कमी करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय झाला. LAC मान्य करुन, जैसे थे परिस्थिती बदलेल असे काही करायचे नाही, यावर दोन्ही बाजू सहमत झाल्या” असे राजनाथ सिंह संसदेत म्हणाले.

 

News English Summary: Defence Minister Rajnath Singh will address parliament on the India-China border row shortly. The minister’s address is expected to take place around 3 pm — at the beginning of the proceedings in the Lok Sabha. The government has been under consistent attack from the Congress, spearheaded by Rahul Gandhi, over the stand-off with China at the Line of Actual Control — the de facto border between the two countries.

News English Title: India Inflicted Heavy Casualties On Chinese Forces During Galwan Clash Rajnath Singh Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)#RajnathSingh(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या