22 January 2025 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771
x

ओडिशा, प. बंगालला २४ तासात अम्फान या मोठ्या चक्रीय वादळाचा इशारा

India Odisha and West Bengal, high alert, cyclone Amphan

नवी दिल्ली, १८ मे: भारताच्या किनारपट्टीला लवकरच अम्फान हे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती मिळाली असून, हे वादळ विक्राळ रूप धारण करणार असल्याचंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. दिल्ली हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, अम्फान या वादळाचं १२ तासांत सुपर चक्रीवादळ रुपांतरण होईल. ते आता उत्तर-ईशान्यच्या दिशेने सरकत असून, २० मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी ते दिघा / हटिया बेट पार करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यावेळी त्याची गती १५५-१६५ ताशी किमी असू शकते आणि तीव्र असल्यास ती 185 ताशी किमी असू शकते. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ बैठक बोलावली आहे.

दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाजपूर, भद्रक, बालासोर, मयूरभंज, गंजम, जगतसिंगपूर, गजपती, नायगड, कटक, केंद्रपारा, खुर्दा आणि पुरी या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तामिळनाडूमध्ये ही अम्फानचा धोका वाढला आहे. येथे रविवारी जोरदार वाऱ्यामुळे शेकडो झाडे कोसळली आणि बरेच नुकसान झाले. कोयंबतूरसह अनेक जिल्ह्यात झाडे कोसळल्याची घटना समोर आली आहे.

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता सुमारे ११ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. याशिवाय ओडिशामध्ये चक्रीवादळाच्या परिणामानंतर लवकरच वीज, पाणीपुरवठा, रस्ते स्वच्छता, बचाव व मदतकार्य सुरू करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी आणि पश्चिम-मध्य भागांत ताशी १३ किलोमीटर वेगाने प्रवास करणारे ‘अम्फान’ १२ तासांत वेग वाढवेल आणि शक्तिशाली रूप घेईल. जोरदार वाऱ्यामुळे कच्च्या घरांचे बरेच नुकसान होणार असून, ‘पक्के’ घरांचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.

 

News English Summary: The Indian Meteorological Department has said that Hurricane Amphan is expected to hit the Indian coast soon. Mrityunjay Mohapatra, director, Delhi Meteorological Department, said the hurricane would turn into a super cyclone in 12 hours.

News English Title: India Odisha and West Bengal on high alert because of cyclone Amphan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x