5 November 2024 5:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

अनलॉकनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; भारताने इटलीला मागे टाकले

India, Covid 19 patients, Crossed Italy Record

नवी दिल्ली, ६ जून: गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९,८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ११५९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ११४०७३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सध्या बिकट अवस्था झाली आहे. सुमारे सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतरही मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या घटलेली नाही. मात्र आता देशाच्या आर्थिक राजधानीपेक्षा राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे.

निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सलग दुसऱ्यादिवशी नऊ हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. करोना व्हायरसमुळे शुक्रवारी २९५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख ट्विट केला आहे. या राष्ट्रांमध्ये संख्या वाढत असताना लॉकडाउन लागू करण्यात आला. मात्र, लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संख्या कमी होताना दिसत आहे. भारतात रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाउन हटवण्यात आला आहे. असं या आलेखातून दिसते. या आलेखांबरोबर राहुल गांधी यांनी “हे अपयशी झालेल्या लॉकडाउनसारखं दिसत आहे,” असं म्हटलं आहे.

 

News English Summary: the last 24 hours, 9,887 new cases of corona were detected across the country. As a result, the total number of corona victims in the country is 2,36,657. In the last few days, about 10,000 new corona patients are being found in India every day. As a result, India ranks sixth in the list of countries with the highest number of corona patients, behind Italy.

News English Title: India ranks sixth in the list of countries with the highest number of corona patients behind Italy News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x