16 April 2025 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

अनलॉक सहज घेऊ नका, आज देशात ९ हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित

Covid 19, Corona Virus, Lockdown, India

नवी दिल्ली, ५ जून: लॉकडाउनचा पाचवा टप्पा आणखी शिथिल केला जात असतानाच सलग दुसऱ्या दिवशी नऊ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण जाले आहे. गुरूवारी देशभरात ९,३०४ नव्या रुग्णांची भर पडली होती. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ९,८५१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २६ हजार ७७० इतकी झाली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्या क्रमांकात भारत जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. राज्यात काल दिवसभरात २ हजार ९३३ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७७ हजार ७९३ वर पोहोचली आहे. तर काल १२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा २ हजार ७१० वर पोहोचला आहे. तसेच राज्यात काल दिवसभरात १ हजार ३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यासह आतापर्यंत ३३ हजार ६१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यातील एकूण रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत काल दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत १ हजार ४३९ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील बाधितांची संख्या ४४ हजार ९३१ वर पोहोचली आहे. तसेच काल ४८ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १ हजार ४६५ वर पोहोचली आहे.

 

News English Summary: As the fifth phase of the lockdown is being further relaxed, more than 9,000 coronary artery patients have been found for the second day in a row, creating an atmosphere of concern. As many as 9,304 new patients were admitted across the country on Thursday. In the last 24 hours, 9,851 corona virus patients have been diagnosed.

News English Title: India Reports 9851 New Covid 19 Cases 273 Deaths In The Last 24 Hours News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या