18 January 2025 12:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा ITR Filing | या लोकांना पैसे कमावून सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही, इन्कम टॅक्सही कृपा करतो, फायदा जाणून घ्या Business Idea | स्वतःचा उद्योग सुरु करा रतन टाटा यांच्यासोबत, 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळेल, महिना लाखोत कमाई होईल
x

शर्जीलला हवा इस्लामी भारत; पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर

JNU, Sharjeels

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)च्या विरोधात निदर्शनं करताना चिथावणीखोर भाषण करणारा ‘जेएनयू’चा विद्यार्थी शर्जील इमाम याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढं आली आहे. ‘शर्जील हा कट्टरतावादी विचारसरणीकडं झुकलेला असून भारत इस्लामी राष्ट्र व्हावं असं मानणाऱ्यांपैकी आहे,’ अशी कबुली त्यानं पोलिसांना दिल्याचं सूत्रांकडून समजतं.

सध्या शरजील इमाम पोलिसांच्या रिमांडमध्ये आहे. अनेक कट्टरपंथीच्या प्रभावाखाली शरजील असल्याने त्याला अटक झाल्याचा कोणताही पश्चाताप नाही असं पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार शरजील इमाम हा धर्मासाठी कट्टर आहे. त्याला भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचं आहे. तसेच त्याचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात कुठेही छेडछाड करण्यात आली नाही हे त्याने कबूल केलं आहे. सध्या त्याच्या व्हिडीओची तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये केली जात आहे.

शरजीलचा मित्र इम्रानला ताब्यात घेण्यात आले असता चौकशी केली तेव्हा शरजीलच्या प्रेयसीची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तिला गाठून तिच्यावर दबाव निर्माण केला आणि शरजीलला भेटण्यासाठी तिला सांगितलं. शरजील आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी तिला भेटायला जाताच पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईत स्थानिक पोलिसही दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकासमवेत होते. शरजील इमामला अटक करणार्‍या पोलीस पथकाचे प्रमुख दिल्ली पोलिसांचे डीसीपी गुन्हे शाखा राजेश देव होते.

पोलिसांनी पहाटे ४ वाजता मुझम्मिलच्या घरावर छापा घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतरच शारजीलचा थांगपत्ता लागल्याचे सांगण्यात आले. परंतु, शारजील स्वत: दिल्ली पोलिसांपुढे शरण आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, शरजीलला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

 

Web Title:  India should be Islamic Country Sharjeels investigation reveals shocking information.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x