26 December 2024 6:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घट । वर्षभरात लोकप्रियता 66 टक्क्यांनी घसरून 24 टक्क्यांवर - सर्वेक्षण

India Today survey 2021

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट | इंडिया टुडेच्या या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे. एकाच वर्षात मोदींची लोकप्रियता 66 टक्क्यांनी कमी होऊन 24 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. भारतासाठी सर्वात उपयुक्त पंतप्रधान कोण असेल? असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. त्यात, ऑगस्ट 2021 मध्ये केवळ 24 टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शवली आहे. दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये 38 टक्के तर ऑगस्ट 2020 मध्ये 66 टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शवली होती. मात्र, या महिन्यात केवळ 24 टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शवली आहे.

लोकप्रियतेच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप ५ मध्ये:
देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आणि कामगिरीचं सर्वेक्षण इंडिया टुडे या माध्यम समुहाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यामध्ये, भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. देशातील सर्वात लोकप्रिय असलेल्या 11 मुख्यमंत्र्यांमध्ये 9 मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षव्यतिरिक्त असलेल्या पक्षाचे आहेत. योगी आदित्यनाथ यांनाही केवळ 29 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. तर, देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा समावेश आहे.

देशातीलटॉप मुख्यमंत्र्यांची क्रमवारी अशा प्रकारे:
१. तामिळनाडूचे एम.के. स्टॅलिन
२. ओडिशाचे नवीन पटनायक
३. केरळचे पिनराईन विजयन
४. महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे
५. प. बंगालच्या ममता बॅनर्जी

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: India Today survey 2021 popularity of PM Narendra Modi is reducing rapidly in on year news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x