23 December 2024 5:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

IND vs ENG | लॉर्ड्सवर भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

INDIA vs ENGLAND

लंडन, १७ ऑगस्ट | भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित सुटला. त्यानंतर ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात आज भारताने इंग्लंडवर 151 धावांनी मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला.

आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलेलं नाही:
त्यानंतर इंग्लंडला 60 षटकांमध्ये 272 धावांचं लक्ष्य दिलं. परंतु भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलेलं नाही. भारतीय गोलंदाजांनी 51.5 षटकांमध्ये अवघ्या 120 धावांत इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद करत या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला आहे. भारताकडून या डावात मोहम्मद सिराजने 4, जसप्रीत बुमराहने 3, इशांत शर्माने 2 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली. दरम्यान, पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या लोकेश राहुलला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूने त्याचं योगदान दिलं आहे. पहिल्या डावात लोकेश राहुलने शतक ठोकलं. तर रोहित शर्माने 83 धावांची जबरदस्त खेळी केली. तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने चिवट फलंदाजी करत शतकी भागीदारी केली. रहाणेने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतक ठोकलं. तसेच अखेरच्या सत्रात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरहाने मोठी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. तसेच गोलंदाजांनीदेखील दोन्ही डावात निर्णायक भूमिका बजावली. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने 4, इशांत शर्माने 3, मोहम्मद शमीने 2 बळी घेतले. तर दुसऱ्या डावात सिराजने पुन्हा एकदा 4 विकेट घेतल्या. बुमराहने 3, इशांतने 2 आणि शमीने 1 विकेट घेतली

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: INDIA vs ENGLAND India Defeated England in Lords Test by 151 runs KL Rahul player of the match news updates.

हॅशटॅग्स

#Cricket(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x