27 December 2024 8:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

बिहार निवडणूक येताच चीनच्या मुद्यावरून NSA अजित डोवाल यांची युद्धाची वक्तव्य

NSA Ajit Doval, India China

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर : पंतप्रधान मोदी यांची बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा पार पडली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला होता. पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर विरोधकांना लक्ष्य केलं. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 एनडीए सरकारने हटवलं. पण विरोधकांना या निर्णय उलटवायचा आहे. अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती.

यावेळी लोकसभा निवडणुकीप्रमाणे मोदींनी शहिद जवानांचा उल्लख करून भावनिक लाभ उठवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. मोदी म्हणाले होते, ‘गलवान खोऱ्यात बिहारचे जवान शहीद झाले. मात्र त्यांनी भारतमातेची मान झुकू दिली नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही बिहारच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यांनी मी शतश: वंदन करतो, असं मोदी पुढे म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना बिहार मागे पडला . बिहारची १० वर्षे वाया गेली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला होता.

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये (East Ladakh) गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे. त्यावेळी परिस्थिती चिघळलेली असताना देखील NSA अजित डोवाल कोणताही धाडसी वक्तव्य करताना दिसले नव्हते. मात्र बिहार निवडणूक लागताच संधी मिळेल तिथे त्यांनी युद्धाची वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी रविवारी चीनपासून पाकिस्तानपर्यंत सर्वांनाच इशारा दिला आहे. शत्रू राष्ट्रांना इशारा देताना डोवाल म्हणाले, इतिहास साक्षी आहे, की भारताने कधीही कुण्याही देशावर हल्ला केलेला नाही. मात्र, जेथे धोका दिसेल, तेथे प्रहार केला जाईल, हे निश्चित. विजयादशमी निमित्त उत्तराखंडमधील ऋषिकेश येथी परमार्थ निकेतनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डोवाल म्हणाले, आपल्याला जेथे वाटते, तेथे आम्ही लढावे हे आवश्यक नाही. जेथून आम्हाला धोका दिसेल, तेथे आम्ही लढू. आम्ही युद्ध तर करणार, आमच्या भूभागावरही आणि बाहेरील भूभागावरही. मात्र, ते आम्ही आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी नाही, तर परमार्थासाठी करू.

भारत एक सभ्य देश आहे. ज्याचे अस्तित्व अनादी काळापासून आहे. भारत आपली समृद्ध संस्कृती आणि सभ्यतेमुळेच कुठलाही धर्म अथवा भाषेच्या परिघात बांधला गेला नाही. एवढेच नाही, तर याच भूमीवरून वसुधैव कुटुंबकम आणि प्रत्येक मानसात इश्वराचा अंश आहे, या तत्वज्ञानाचा प्रचार झाला. एक देश म्हणून भारताला मजबूत ओळख देण्यात आणि संस्कारक्षम बनविण्यात येथील संत मंडळींचे मोठे योगदान आहे. येथील संतांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे, असेही डोवाल म्हणाले.

एनएसए डोवाल यांच्या वक्तव्यावर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे, एनएसए डोवाल यांचे वक्तव्य चीनसंदर्बात नसून, ते भारताच्या आध्यात्मिक विचारांसंदर्भात आहे. मात्र, भारत कुठल्याही देशाला घाबरणार नाही. तसेच युद्धाच्या कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे, असे डोवाल यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.

 

News English Summary: A day after National Security Advisor (NSA) Ajit Doval’s statement at an ashram in Rishikesh was projected as a remark on China and the ongoing conflict in the Eastern Ladakh sector, the Centre issued a clarification saying he was speaking purely in a civilisational and spiritual context. The officials clarified, National Security Advisor (NSA) Ajit Doval was not referring to any country or specific situation at the religious function in Rishikesh on Saturday.

News English Title: India will fight on our soil as well as on foreign soil says NSA Ajit Doval News Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x