5 February 2025 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

चिनी कंपन्यांना महामार्गाचे कंत्राट मिळणार नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची योजना

India, Chinese Companies, Highway Projects, Nitin Gadkari

नवी दिल्ली, १ जुलै : चिनची आर्थिक नाडी पकडण्यासाठी केंद्र सरकारने दोनच दिवसांपूर्वी डिजिटल स्ट्राईक करून टिकटोकसह 59 अँपना बंदी आणली. आता केंद्र सरकार कडून आणखी एक पाऊल उचलले गेले आहे. त्यानुसार चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतलं जाणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. पीटीआयशी बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

भारतातील अनेक रस्ते महामार्गाचे कंत्राट चिनी कंपन्यांना दिले जाते. त्यामुळे यापुढे कोणत्याही चिनी कंपन्यांना कंत्राट दिले जाणार नाही तसेच भागीदारीच्या माध्यमातूनही कोणत्याच चिनी कंपनीला देशातील रस्तेनिर्माण क्षेत्राशी संबंधित काम दिले जाणार नाही,” असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट सांगितलं आहे. भारतीय कंपन्यांना या नव्या नियमामुळे चिनी कंपन्यांपासून फारकत घ्यावी लागणार आहे. अन्यथा त्यांनाही कंत्राट मिळणार नाही असं नितीन गडकरी यांनी सूचित केलं आहे.

“चीन सहभागीदार असणाऱ्या कंपन्यांना रस्ते बांधण्याची परवानगी आम्ही देणार नाही. आम्ही यासंबंधी कठोर निर्णय घेतला असून जर चिनी कंपन्यांनी भागीदार असलेल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या देशात येण्याचा प्रयत्न केला तर रोखण्यात येईल,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी यांनी यावेळी लघु, लघु आणि मध्यम उद्योगांपासून चिनी गुंतवणुकदारांना लांब ठेवण्यात येईल असंही सांगितलं आहे.

गलवान घाटीमध्ये हिंसक घटना घडल्यानंतर भारतात #BoycottChina मोहिम सुरु झाली. यानंतर रेल्वेने मोठा निर्णय घेत चिनी कंपनीला दिलेले 471 कोटींचे कंत्राट रद्द केले होते. 16 जूनला गलवानमध्ये 20 शहीद झाले होते. रेल्वेने हा निर्णय 18 जूनला घेतला होता. तर बीएसएनएल आणि एमटीएनएलने चीनच्या कंपन्यांना दिलेले 4जी चे कंत्राट आजच रद्द केले आहे. केंद्र सरकारने मंगळवारी चीनच्या 69 अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, हॅलो, युसी वेब आदी अ‍ॅप आहेत.

 

News English Summary: The central government has decided not to involve Chinese companies in the national highway project. The announcement was made by Union Minister for Land Transport and Highways, Micro, Small and Medium Enterprises Nitin Gadkari.

News English Title: India Will Not Allow Chinese Companies To Participate In Highway Projects Says Nitin Gadkari News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x