19 April 2025 1:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

आपत्तींमुळे संपूर्ण वर्षच खराब आहे हा विचार करणं चुकीचं - पंतप्रधान

PM Narendra Modi, Ladakh, India China, Indian Army

नवी दिल्ली, २८ जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत आहेत. भारतावर कोरोनाचं संकट असताना, भारत कोरोनाशी सामना करत असतानाच यादरम्यान भारत शेजारील देशाकडून येणाऱ्या आव्हानांचाही सामना करत आहे. परंतु भारत मैत्री निभावतो तसं वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देत असल्याचं सांगत मोदींनी चीनला इशारा दिला आहे.

आपण भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या जवानांचा अभिमान आहे. हुतात्म्यांसमोर संपूर्ण देश कृतज्ञ असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली आहे. 2020 हे वर्ष खराब असल्याची चर्चा सुरु आहे. 2020 या वर्षात अनेक आपत्ती, संकटं आली, संकट येतच असतात परंतु या आपत्तींमुळे संपूर्ण वर्षच खराब आहे हा विचार करणं चुकीचं असल्याचं मोदींनी सांगितलं.

ज्या कुटुंबातले जवान शहीद झाले त्यांनीही घरातल्या दुसऱ्या मुलांना सैन्यातच भरती करणार असं म्हटलं आहे. शहीदांच्या कुटुंबांबद्दल देशाला अभिमान आणि गर्व आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

तसेच गेल्या अनेक वर्षांपासून भारताने कमी संकटांचा सामना केला आहे. एका वर्षात अनेक संकटांचा सामना आपण केला आहे. मात्र डगमगून जाण्याची गरज नाही. आपण संकटांचा सामना करतो आहोत असंही मोदींनी म्हटलं आहे. अनेक संकटांचा सामना करत आपल्याला पुढे जायचं आहे. या वर्षातच आपल्याला नवी स्वप्नं पाहायची आहेत हे कुणीही विसरु नये. मला १३० कोटी भारतीयांवर पूर्ण विश्वास आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. संकट कितीही मोठं असलं तरीही भारताचे संस्कार हे निस्वार्थ भावनेने सेवेची प्रेरणा देतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: India has faced fewer crises over the last several years. We have faced many crises in one year. But there is no need to waver. PM Narendra Modi has also said that we are facing crises.

News English Title: Indian Army Gave Strong Answer To China In Ladakh Says Prime MInister Narendra Modi News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या