7 January 2025 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE
x

Plastic Ban | केंद्र सरकारची सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी | काय आहेत नवे नियम?

Plastic Ban

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट | देशातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती, विक्री, साठवण तसेच वाहूतक करण्यास बंदी असेल. पर्यावरणप्रेमींनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम 2021 जारी केला आहे. याअंतर्गत वरील निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या अधिनियमानुसार 1 जुलै 2022 पासून पॉलिस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह सिंगल यूज प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल. यामध्ये प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. झेंडा, फुगे, आईसक्रीम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉल यांचे उत्पान करण्यात बंदी असेल. तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, स्वीट बॉक्स, इन्विटेशन कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवरील प्लास्टिकचे रॅप अशा वस्तूंची निर्मिती करण्यासही बंदी असेल.

नव्या नियमांनुसार येत्या 30 सप्टेंबर 2021 पासून प्लास्टिक पिशवीची जाडी 50 मायक्रॉनवरून 75 मायक्रॉन केली जाईल. तसेच पुढील वर्षी 31 डिसेंबर 2022 पासून हीच जाडी 120 मायक्रॉनपर्यंत वाढवली जाईल. सध्याच्या नियमानुसार देशात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या पिशव्यांचे उत्पादन, साठवण करण्यास बंदी आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Indian government bans manufacturing sales and use of single use plastic news updates.

हॅशटॅग्स

#PlasticBanned(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x