22 December 2024 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले
x

BREAKING - भारतीय उद्योग जगताला मिळू शकते कर्मचार्‍यांसाठी कोविड लस खरेदीची परवानगी

Indian Industry, Companies, Covid Vaccine

नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर : केंद्र सरकार धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाच्या व्यावसायिक कंपन्यांना कोविड-१९ लस (Covid Vaccine) ही थेट विकासकांकडून खरेदी करण्यासाठी कराराची परवानगी देण्याबाबत विचार करू शकते. जेणेकरुन कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कोविड-१९ पासून वाचवू शकतील. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतातील बहुतेक लस योजना केंद्र सरकारकडून देण्यात येतील आणि यासाठी सुमारे ५० हजार कोटी खर्च होण्याचा अंदाज आहे. त्यात त्यांनी असंही म्हटलं आहे की, बहुतेक तज्ञ आणि विश्लेषकांच्या मते २०२१ मध्ये भारतातील प्रत्येकाला ही लस मिळेल असं होणार नाही. सर्वांना लस मिळण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे.

अधिकाऱ्यांने सांगितले की, कंपन्यांना लस खरेदी करण्याची परवानगी देण्याबाबत विचार केला जात आहे. कारण सरकारला हे सुनिश्चित करायचे आहे की, मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये कोविड-१९ मुळे कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये. या प्रस्तावाला पंतप्रधान कार्यालयाने मान्यता दिली आहे.

अर्थव्यवस्था सुधारण्यसाठी सरकारचे अनेक प्रयत्न सुरु:
भारतात उद्योग विश्वातीला मोठ्या कंपन्यांसाठी सध्या अत्यंत आव्हानात्मक स्थिती आहे. कारण पहिल्या त्रैमासिकात सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. ही घट झाल्यानंतर सरकार आपल्या अर्थव्यवस्था वाढीसाठी बरेच प्रयत्न करत आहे. दरम्यान, कोविड या साथीच्या रोगाविषयीचं व्यवस्थापन आणि भारताची अर्थव्यवस्था यावरुन मोदी सरकारबाबत आता सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारने आतापर्यंत अनलॉकचे विविध टप्पे जाहीर केले आहेत. त्यामुळे बरेच उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले आहेत. ज्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल अशीच सर्वांना आशा आहे.

या कंपन्या तयार करत आहेत लस:
ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड यांच्यासाठी लस बनविणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस उत्पादनाच्या तिसर्‍या टप्प्यात आहे. भारतीय औषध निर्माता कंपनी Zydus Cadila यांनी ६ ऑगस्टपासून कोविड लसींसाठी टप्प्यातील द्वितीय चाचणी सुरू केल्या आहेत. भारत बायोटेक नावाची आणखी एका फार्मा कंपनी सप्टेंबरमध्ये दुसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू केली आहे.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोना रुग्णांनी ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ६५ लाखांवर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत ९४० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे देशात कोरोना या धोकादायक विषाणूमुळे मृत पावलेल्यांची संख्या १ लाख १ हजार ७८२वर पोहोचली आहे. सध्या देशात करोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४९ हजार ३७४ इतकी आहे.

 

News English Summary: The Union government will consider a plan to allow companies, especially large ones in strategically important businesses, to strike direct deals with Covid-19 vaccine developers to secure doses for their employees, officials familiar with the matter said, detailing the current thinking in policy circles about the country’s vaccine plan. The officials, who asked not to be named, added that much of India’s vaccine plan will be funded by the state and cost around Rs 50,000 crore; they also confirmed what most experts and analysts have been saying that not everyone in India will be able to get a shot in 2021.

News English Title: Indian Industry may get permission to buy Covid Vaccine for its employees Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x